Satara Crime: प्राध्यापकाची नियत ढळली, विद्यार्थिनीलाच म्हणाला, 'माझ्याशी शरीरसंबंध ठेव'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 17:01 IST2026-03-18T17:00:23+5:302026-03-18T17:01:17+5:30
सातारा जिल्ह्यातील एका महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Satara Crime: प्राध्यापकाची नियत ढळली, विद्यार्थिनीलाच म्हणाला, 'माझ्याशी शरीरसंबंध ठेव'
Satara Crime: महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका प्राध्यापकाने थेट विद्यार्थिनीसोबत नको तो प्रकार केला. विद्यार्थिनीला सोशल मीडियावरून संपर्क करून तिच्याकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. हा प्रकार समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली.
उंब्रजमधील एका महाविद्यालयातील युवतीला त्याच महाविद्यालयातील प्राध्यापकाने सोशल मीडियावरून अश्लील मेसेज करून शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
याप्रकरणी संबंधित प्राध्यापकावर उंब्रज पोलिस ठाण्यात मंगळवारी (१७ मार्च) सायंकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्राध्यापकाला तत्काळ अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित युवती ही एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, संशयित आरोपी प्राध्यापक धनाजी तानाजी सावंत (रा. पापरी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याने तिला मोबाईलवर अश्लील मेसेज केले. त्याने मेसेज करून शरीर सुखाची मागणी केली.
या प्रकारामुळे घाबरलेल्या युवतीने ही घटना कुटुंबीयांना सांगितली. यानंतर कुटुंबीयांसह युवतीने थेट उंब्रज पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकाराची तत्काळ दखल घेत संशयित आरोपीवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.