शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

संजय पाटील खूनप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा

By admin | Updated: October 18, 2014 23:27 IST

पावणेसहा वर्षांनंतर निकाल : उदयसिंह पाटील व सल्या चेप्यासह नऊजणांची निर्दोष मुक्तता

सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्याचा निकाल शनिवारी जाहीर झाला. त्यामध्ये आरोपी सागर बाबू परमार (वय २८) आणि हमीद रहिम शेख (वय २९, रा. कार्वे नाका कऱ्हाड) या दोघांना तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. पी. रघुवंशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, या खटल्यात आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील व सल्या चेप्यासह नऊजणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्याचा निकाल पावणेसहा वर्षांनंतर लागला.या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, दि. १५ जानेवारी २००९ रोजी महाराष्ट्र केसरी संजय पाटील हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत कऱ्हाड येथील हॉटेल शिवदर्शनमधून चहा पिऊन बाहेर येत होते. त्याचवेळी दोन अज्ञात युवकांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात युवकांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, काही दिवसांतच पोलिसांनी या प्रकरणातील सर्व संशयित अकरा आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये विलासराव पाटील-उंडाळकर याचे चिरंजीव अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांचाही समावेश होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान एकूण ६५ साक्षीदार तपासले. तसेच अण्णा गावडे, हणमंत पवार, बाबासाहेब पाटील या तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह १७ साक्षीदार फितूर झाले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षी ग्राह्य मानून न्यायाधीशांनी सागर परमार आणि हमीद शेखला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड, दंड न दिल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावलीजिल्हा सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. अ‍ॅड. धैर्यशील पाटील, अ‍ॅड. श्रीकांत जाधव यांनी बचाव पक्षातर्फे काम पाहिले. (प्रतिनिधी)‘राजकीय असूयेपोटी उदयसिंहांना गोवले!’‘अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अनावश्यक जादा तपास करण्याचा फार्स केला. पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी केलेला तपास न्यायाधीशांनी स्वीकारला. उदयसिंह पाटील यांना राजकीय असुयेपोटी गोवण्यात आले आहे. जादा तपास म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. आणि राजकीय द्वेषापोटीच उदयसिंहांना अडकविण्यात आले आहे, अशा प्रकारे न्यायाधीशांनी पोलिसांवर ताशेरे ओढले,’ अशी माहिती बचाव पक्षाचे वकील धैर्र्यशील पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.