धावडशीच्या जवानाची आत्महत्या

By Admin | Updated: November 26, 2015 00:05 IST2015-11-26T00:05:13+5:302015-11-26T00:05:13+5:30

कारण अस्पष्ट : अभिजित पवार यांच्या जाण्याने गावावर शोककळा

The runner's suicide | धावडशीच्या जवानाची आत्महत्या

धावडशीच्या जवानाची आत्महत्या

किडगाव : सातारा तालुक्यातील धावडशी गावचे मूळ रहिवासी असलेले लष्करी जवान अभिजित दिलीप पवार (वय २४) यांनी सोमवारी (दि. २३) रात्री आसामात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही; मात्र त्यांच्या आकस्मिक जाण्याने धावडशी गावावर शोककळा पसरली आहे.
अभिजित पवार हे ‘आसाम रायफल्स’मध्ये कार्यरत होते. २०१० मध्ये ते लष्करी सेवेत भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण धावडशी येथेच झाले. साताऱ्याच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात कला शाखेत त्यांनी उच्चशिक्षण पूर्ण केले होते.
अभिजित यांचे वडील दिलीप पवार शेती करतात, तर आई सुरेखा या त्यांना मदत करतात. अभिजित यांना अश्विनी आणि अमृता अशा दोन विवाहित बहिणी असून, अमृता यांच्या विवाहावेळी जून महिन्यात अभिजित गावी येऊन गेले होते. त्यानंतर त्यांच्या आजीचे निधन आॅगस्ट महिन्यात झाले, तेव्हा ते एक महिन्याची सुटी घेऊन गावी आले होते. गेल्या सोमवारी (दि. १६) त्यांचे आजोबा आनंदराव पवार यांचे निधन झाले; मात्र त्यावेळी रजा न मिळाल्याने अभिजित गावी येऊ शकले नाहीत. अभिजित हे आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. मनमिळावू स्वभावामुळे ते गावात लोकप्रिय होते. (वार्ताहर)

Web Title: The runner's suicide