शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

छडी लागे छम छम... सुगंध येई घम घम!

By admin | Updated: November 17, 2015 00:01 IST

देऊरच्या शिक्षकाचे वृक्षपे्रम : विद्यार्थ्याने भेट दिलेल्या छडीतून फुलवले कणेरीचे फूलझाड -- गूड न्यूज

संजय कदम -- वाठार स्टेशन  ‘छडी लागे छमछम..विद्या येई घमघम’ असं महात्म्य असलेल्या छडीचा प्रसाद शालेय जीवनात प्रत्येकानेच खाल्ला असेल. आता अभ्यास वदवून घेणाऱ्या या छडीवर बंधने आली असून शिक्षकाच्या हातात दिसणारी छडीही गायब झाली आहे. परंतु एखाद्या विद्यार्थ्याने शिक्षकाला भेट म्हणून दिलेल्या छडीतून एका सुंदर फूलझाडाची निर्मिती करण्याची घटना ही निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरु शकते.देऊर येथील एक वृक्षमित्र शिक्षक प्रकाश कदम हे वृक्षारोपणाला चालना देत आहेत. झाडांविषयी त्यांना आपुलकी आहे. म्हणूनच गावात, गावाबाहेर मागेल त्याला ते स्वखर्चातून रोपे देतात. शिक्षकाने सांगितलेला अभ्यास पूर्ण न करणारी मुले विद्यालयात शिक्षा घेण्यास घाबरतात. त्यांचेच वर्गमित्र सर्वांना छडीचा प्रसाद देण्यासाठी एकापेक्षा एक अशा वेगवेगळ्या वनस्पतींची काठी छडी म्हणून शिक्षकांना आणून देतात. असेच काम दोन वर्षांपूर्वी स्वप्नील माने या विद्यार्थ्याने सातवीत शिक्षण घेत असताना केले. त्याने प्रकाश कदम सरांना एक छान गुळगुळीत कणेरी या वनस्पतींची काठी छडी म्हणून भेट दिली. तसे पाहिले तर आता छडीचा वापर करण्यावरच बंधने आली आहेत. मात्र तरीही कदम यांनी ती काठी आनंदाने स्वीकारली. छडीने विद्या येईल की नाही, माहीत नाही पण या छडीतून सुगंध मात्र येऊ शकतो, हे त्यांनी ओळखले. त्यांनी काठीचे दोन भाग करुन घरातील कुंडीत माती भरुन या काठ्या रोवल्या. निसर्गनियमाप्रमाणे या काठ्यांना अंकुर फुटले. आता त्याचे सुंदर झाडात रूपांतर झाले आहे.ज्या मुलाने ही छडी प्रकाश कदम यांना भेट म्हणून दिली, तो मुलगा आता नववीत शिकत आहे. त्यालाही या छडीचे पुढे काय झाले, याची कल्पनाही नव्हती. परंतु प्रकाश कदम यांनी या मुलास या सुंदर फुलांच्या झाडाजवळ उभे करुन त्याने दोन वर्षांपूर्वी दिलेल्या छडीची त्याला आठवण करुन दिली. विद्यार्थ्याच्या अनोख्या भेटीमुळे त्याचे कौतुक करून भेटवस्तू देऊन या मुलाचा सन्मान केला. बहरलेल्या कणेरीने गैरसमज केले दूरकदम यांनी घरातील कुंडीत लावलेल्या कणेरीचे रोप तयार झाले; परंतु कणेरी या वनस्पतीबाबत लोकामध्ये असलेल्या गैरसमजामुळे याचे वृक्षारोपण करण्यास गावात कुणीच पुढाकार घेत नव्हते. अखेर या रोपाचे पालकत्व गावातील प्रकाश मारुती कदम यांनी स्वीकारले. आज हे झाड फुलांनी गजबजून गेले आहे. रस्त्याने जाणारे अनेक वाटसरु या झाडाची फुले देवासाठी घेऊन जातात.