शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला; कोयना साठ्यात दीड टीएमसी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 13:31 IST

Rain Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून साताऱ्यातही जोरदार सरी पडत आहेत. सततच्या पावसामुळे प्रमुख धरणसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे. तर २४ तासांत कोयना धरणात दीड टीमएमसीने वाढ झाली. त्यामुळे सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात ५१.४९ टीएमसी साठा झाला होता. तर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस नवजाला ९८ मिलीमीटर झाला.

ठळक मुद्देपश्चिम भागात पावसाचा जोर वाढला; कोयना साठ्यात दीड टीएमसी वाढ५१ टीएमसीवर साठा : जिल्ह्यात नवजाला सर्वाधिक ९८ मिलीमीटरची नोंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून साताऱ्यातही जोरदार सरी पडत आहेत. सततच्या पावसामुळे प्रमुख धरणसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे. तर २४ तासांत कोयना धरणात दीड टीमएमसीने वाढ झाली. त्यामुळे सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात ५१.४९ टीएमसी साठा झाला होता. तर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस नवजाला ९८ मिलीमीटर झाला.जिल्ह्यात तीन आठवड्यांच्या खंडानंतर मागील आठवड्यात पाऊस सुरू झाला आहे. सध्या हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस होत आहे. या पावसामुळे पश्चिमेकडे भात लागणीच्या कामाला वेग आला आहे. तसेच प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यातही हळू हळू वाढ होताना दिसून येत आहे.

सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात नवजा येथे सर्वाधिक ९८ मिलीमीटर पाऊस झाला. तर जूनपासून आतापर्यंत तेथे १८२४ मिलीमीटरची नोंद झालेली आहे. तर कोयनेला ४९ व जून महिन्यापासून १३१२ मिलीमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ६७ आणि यावर्षी आतापर्यंत १८३० मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. शनिवारच्या तुलनेत पश्चिम भागात पाऊस अधिक झाला.रविवारी सकाळी कोयना धरणात ५०.०४ टीएमसी पाणीसाठा झालेला. तर सोमवारी ५१.४९ टीएमसी साठा होता. कोयना धरणात २४ तासांत जवळपास दीड टीएमसी पाणी वाढले. त्याचबरोबर धरणात येणाºया पाण्याची आवक चांगली आहे. सकाळच्या सुमारास १६७०६ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.दरम्यान, जिल्ह्यातील धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरण परिसरातही पाऊस होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यातही हळू हळू वाढ होताना दिसून येत आहे. पूर्व दुष्काळी भागात कधीतरी पावसाची एखादी सर पडत आहे. अजुनही ओढ्यांना पाणी नाही. तर सातारा शहरात रविवारी रात्रीपासून चांगला पाऊस होत आहे. सोमवारी सकाळीही सरी पडल्या. यामुळे नागरिकांची तसेच विक्रेत्यांची धावपळ उडाली. 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर