साताऱ्यात दोन जुगार अड्ड्यांवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:39 IST2021-04-01T04:39:47+5:302021-04-01T04:39:47+5:30

सातारा : पोलिसांनी शहर व परिसर आणि आजूबाजूच्या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकण्यास सुरुवात केली आहे. दोन ...

Raid on two gambling dens in Satara | साताऱ्यात दोन जुगार अड्ड्यांवर छापा

साताऱ्यात दोन जुगार अड्ड्यांवर छापा

सातारा : पोलिसांनी शहर व परिसर आणि आजूबाजूच्या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत पोलिसांनी दोन ठिकाणी छापा मारला असून, यापैकी एक कारवाई सातारा शहर तर दुसरी कारवाई शाहूपुरी पोलिसांनी केली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांनाही प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. दोन्ही कारवायांत चार मोबाइल आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.

सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली येथील आयसीआयसीआय बँक परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा मारून १ हजार १६० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य, मोबाइल जप्त केला आहे. या प्रकरणी नीलेश चंद्रकांत कांबळे (वय ३४, रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) आणि समीर कच्छी (रा. मोळाचा ओढा, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

शाहूपुरी पोलिसांनी अर्कशाळा परिसरात जुगार अड्ड्यावर छापा मारून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अशोक काळे आणि आण्णा चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत शाहूपुरी पोलिसांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, गेंडामाळ नाका ते गडकर आळी जाणाऱ्या पूर्व बाजूस असणाऱ्या अर्कशाळेच्या वॉलकम्पाउंडच्या लगत असलेल्या पानटपरीच्या आडोशाला जुगार अड्डा सुरू होता. पोलिसांना याची माहिती मिळताच तेथे छापा मारण्यात आला. या प्रकरणी अशोक दिनकर गोळे (वय ४८, रा. मंगळवार पेठ, सातारा) आणि आण्णा चव्हाण (रा. तेलीखड्डा, शनिवार पेठ, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ हजार ४५ रुपयांची रोकड आणि दोन मोबाइल जप्त केले आहेत.

Web Title: Raid on two gambling dens in Satara