पडळकर यांच्या विरोधात जनहित याचिका : हेमंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:39 IST2021-07-29T04:39:11+5:302021-07-29T04:39:11+5:30

सातारा : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती इंडिया अगेन्स्ट करप्शनचे ...

Public Interest Litigation against Padalkar: Hemant Patil | पडळकर यांच्या विरोधात जनहित याचिका : हेमंत पाटील

पडळकर यांच्या विरोधात जनहित याचिका : हेमंत पाटील

सातारा : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली.

गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे” व सोलापूर येथे सभेत “रात्र गेली हिशोबात पोरग॔ं नाही नशिबात,” असे अश्लील व अभद्र वक्तव्य करून आपली प्रसिद्धी करून घेतली.

मात्र, यामुळे शरद पवार यांची बदनामी झाली आहे. याबाबतीत उच्च न्यायालयाच्या निदर्शनास हेमंत पाटील यांनी आणून दिले आहे. कलम १२० बी, १५९, १४६ आणि ५०० आयपीसीप्रमाणे गुन्हे दाखल करून पुढील योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही, तोपर्यंत पडळकर यांनी शरद पवार यांच्या विरोधात कोणतेही अपशब्द वापरू नयेत, असे हेमंत पाटील यांनी जनहित याचिकेत म्हटले आहे.

गोपीचंद पडळकर हे सतत शरद पवार यांच्या विरोधात काहीही बोलून आपली लायकी दाखवत असतात. नरेंद्र मोदी भारताचे प्रधानमंत्री व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांचा राजकीय सल्ला घेत असतात. भाजपचे केंद्रीय मंत्री बारामतीतील विकासकामे पाहणीसाठी बारामतीचा दौरा करीत असतात, त्यामुळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना अशी वक्तव्ये करणे शोभत नाही, असे हेमंत पाटील म्हणाले.

फोटो : २८हेमंत पाटील

Web Title: Public Interest Litigation against Padalkar: Hemant Patil