शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मिळणार योग्य मोबदला

By admin | Updated: September 14, 2014 00:00 IST

शिरवळ-लोणंद चौपदरीकरणाचा तिढा : दुकानदार, व्यावसायिकांनाही भरपाई देण्याची प्रशासनाची भूमिका

शिरवळ : शिरवळ-लोणंद चौपदरीकरण रस्त्याचा गेल्या अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. याबाबत शेतकरी आणि प्रशासन यांच्या नुकतीच समन्वय बैठक पार पडली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून जास्तीत जास्त मोबदला देण्याची भूमिका प्रशासनाने घेतल्याने उच्च न्यायालयातील लढा मागे घेण्याची भूमिका शेतकरी कृती समितीने घेतली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे.खंडाळा येथील तहसील कार्यालयात पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कृती समिती व प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार शिवाजी तळपे, रस्ते विकास महामंडळाचे अभियंता आर. वाय. पाटील, पी. आर. गायकवाड, यांची बैठक झाली. यामध्ये या रस्त्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना योग्य मोबदला देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे.रस्ता दुरुस्तीसाठी शासनाने शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवून खड्डे मुजविण्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. काही व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांचे होणारे नुकसान प्रत्यक्ष पाहणी करून त्याची भरपाई देण्याचे प्रांताधिकारी यांनी सांगितले आहे. व्यावसायिकांना जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे.यावेळी पुरुषोत्तम जाधव, समितीचे दत्तात्रय दगडे, कोंडिबा उम्रटकर, चंद्रकांत यादव, धनाजी जाधव, रमेश गोसावी, भिकू ननावरे, तनाजी चव्हाण, कुंडलिक दगडे, सदस्य उपस्थित होते. अडतीस गावांतील शेतकऱ्यांना लाभगेल्या दोन वर्षांपासून शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी लढा उभारला होता. रस्त्याच्या कामात ३८ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. योग्य मोबदला न दिलेल्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे रस्त्याचे काम बारगळले होते. (प्रतिनिधी)