शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सल्याच्या सहकाऱ्याच्या घरावर छापा

By admin | Updated: November 7, 2015 23:37 IST

कागदपत्रांची तपासणी : हालचालींवर पोलिसांचा वॉच; कारवाईबाबत गोपनीयता

कऱ्हाड : मोक्काप्रकरणी अटकेत असलेल्या सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्याच्या साथीदाराच्या घरावर शुक्रवारी पोलिसांनी अचानक छापा टाकला. त्याठिकाणी काही कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली. मात्र, या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली असून, प्राथमिक चौकशी केल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. कऱ्हाडातील गुंड सल्याच्या टोळीवर कऱ्हाड पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. सध्या सल्या येरवडा कारागृहात असून, त्याच्या जामिनासाठी एका साथीदाराचे प्रयत्न सुरू आहेत. सल्यावर गोळीबार झाल्याने तो कायमचा जायबंदीही झाला आहे. त्याला चालता येत नाही. सल्याला जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्जही सादर करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. याच पार्श्वभूमीवर सल्याच्या टोळीतील इतर सदस्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एच. एन. काकंडकी यांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी त्याच्या साथीदारांवर नजर ठेवण्याच्या सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार शुक्रवारी एका साथीदाराच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात त्याच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली. सल्याचे आर्थिक व्यवहार त्याच्या माध्यमातून चालत असल्याची माहिती मिळाल्याने हा छापा टाकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कऱ्हाड पोलिसांनी कागदपत्रे तपासून साथीदाराकडे कसून चौकशी केली. त्यानंतर अन्य काही टोळ्यांतील साथीदारांकडेही पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी सुरू असल्याचे समजते. (प्रतिनिधी)