शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे प्राबल्य राष्ट्रवादी मोडीत काढणार?

By admin | Updated: October 29, 2015 00:17 IST

वाई तालुका : ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार जोमात; मतदारांच्या भेटीगाठी वाढल्या

संजीव वरे --वाई तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या केंजळ, जांभ आणि ओझर्डे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. बहुतेक निवडणुका राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील व किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत. मतदारांच्या गाठीभेटी वाढल्या असून, निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. वाई तालुक्यातील केंजळ, जांब, ओझर्डे, सुलतानपूर, वाघजाईवाडी व गोरेगाव या सहा ग्रामपंचायतींसह इतर आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होत आहेत. यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या केंजळ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पुरस्कृत किसन वीर कारखान्याचे संचालक प्रवीण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून ११ जागांसाठी निवडणूक लढविली जात आहे. जांबमध्ये माजी सभापती प्रमोद शिंदे यांच्या नेतत्वाखाली चिलाईदेवी परिवर्तन पॅनेल व किसन वीर कारखान्याचे संचालक मधुकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चिलाईदेवी ग्रामविकास पॅनेल यांच्यात १३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीसाठी लढत होत आहे. तर ओझर्डेमध्ये काँग्रेसकडून शेतकरी पॅनेलचे नेतृत्व हणमंतराव पिसाळ व सी. व्ही. काळे तर राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पिसाळ व तिसऱ्या ओझर्डे विकास आघाडीचे नेतृत्व दिलीप फरांदे करीत आहे. या ठिकाणी १५ जागांसाठी निवडणूक होत असून, उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटीगाठींवर जोर दिला आहे.तिन्ही ठिकाणी राजकीय प्रचार वाढला असून, उमेदवारांचा मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्याकडे कल वाढला आहे. ग्रामपंचायतींवर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी उमेदवारांचे कसोशीने प्रयत्न सुरू केले आहे.निवडणुकीकडे तालुक्याच्या नजराकेंजळ, जांब, ओझर्डे यासह इतर गावांमध्येही स्थानिक प्रश्नांवर निवडणुका लढविल्या जात आहे. तालुक्यात आजी-माजी आमदारांच्या नावावर व कॉँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून निवडणुका होत असून दुसऱ्या पक्षाचे अस्तित्व कोठेही दिसून येत नाही. महत्त्वाच्या तिन्ही ग्रामपंचायतींवर कॉँग्रेसचे प्राबल्य होते. राष्ट्रवादी हे प्राबल्य मोडीत काढणार की, कॉँग्रेस सत्ता अबाधित ठेवणार याकडे सपंूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होणार आहे.