शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापगड कामगारांचा आत्मदहनाचा इशारा

By admin | Updated: July 17, 2014 23:18 IST

वेज बोर्ड लागू करण्याची मागणी जोरात

कुडाळ : जावळी तालुक्यात एकमेव सहकाराचा आधारवड असलेला प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे कामगार गेल्या पंधरा दिवसांपासून वेज बोर्ड लागू करण्यासंदर्भात काम बंद आंदोलन करीत आहेत. पावसात भिजत आंदोलन करणाऱ्या या आंदोलनकर्त्या कामगारांचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा, अशी सर्वांचीच इच्छा आहे. १६ वर्षांचा भाडेकरार करताना गोडी-गुलाबीने दोन्ही कारखान्यांच्या प्रशासनाने एकमेकांच्या अटी साखर आयुक्तांसमोर मान्य केल्या. मग आता कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करु नये, अशीही मागणी होत आहे.दिवंगत लालसिंगराव शिंदे यांनी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला जावा. तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराची आर्थिक संधी मिळावी, या उद्देशाने प्रतापगड सहकारी साखर कारखाना जावळीत उभा केला. परंतु कर्जबाजारी झाल्यामुळे कारखाना १६ वर्षांसाठी कर्जमुक्त करता यावा, यासाठी किसन वीर साखर कारखान्याने भाडेकराराने चालवण्यास घेतला. भाडे करारात साखर आयुक्तांसमोर कामगारांना २०१३ चा गाळप हंगामानंतर वेज बोर्ड लागू करण्यासंदर्भाचा लेखी करार होऊनही कामगारांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे कामगार पंधरा दिवसांपासून आंदोलनास बसले आहेत.सोमवारी कारखाना प्रवेद्वारावर किसन वीर-प्रतापगड कामगार आमने-सामने आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष व लालसिंगराव शिंदे यांचे नातू सौरभ शिंदे यांच्यासह कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्या उद्देशाने हा सहकाराचा आधारवड जावळीत उभा राहिला. त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तींवर कामगारांसाठी ही वेळ आली आहे. अद्याप किसनवीर कारखाना प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे संबंधिताना घाम गाळणाऱ्या कामगाराना कधी न्याय मिळणार, अशी विचारणाही आंदोलकांनी केला आहे.या आंदोलनामुळे सोनगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तोडग्याच्या प्रतीक्षेत सर्व कामगार आहेत. (प्रतिनिधी)कारखान्यात घाम गाळून कामगार काम करतो. मात्र, जर कामगारांच्या न्याय मागण्यांकडे किसन वीरने आतापर्यंत दुर्लक्ष केले. व आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. हे सहकार क्षेत्राला शोभनीय नाही. पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला किसन वीरने प्रतिसाद न दिल्यामुळे प्रतापगड कामगार आता कुटुंबासह ठिय्या आंदोलन करणार. त्यातूनही मार्ग निघाला नाही तर कामगार सामूहिक आत्मदहन करतील, असा इशारा प्रतापगड कामगार संघटना अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी दिला आहे.