शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

कवठेत सापडले खवले मांजर

By admin | Updated: June 8, 2015 00:51 IST

बघ्यांची गर्दी : ओढ्यालगतच्या एक घरात उकरली जमीन

कवठे : कवठे, ता. वाई येथील दीपक जगन्नाथ गुरव यांच्या घरात रविवारी पहाटे खवले मांजर सापडले. डोंगरी भागात झाडाझुडपांत आढळणारे दुर्मिळ असे खवले मांजर लोकवस्तीत आढळल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. खवले मांजर पाहण्यासाठी कवठेकरांनी एकच गर्दी केली होती.दीपक गुरव यांचे घर गावच्या ओढ्यालगत आहे. रविवारी मध्यरात्री खवले मांजर दीपक गुरव यांच्या घरात घुसले. पहाटेच्या दरम्यान ते घरात लपण्यासाठी जमीन उकरू लागले असता त्या आवाजाने दीपक गुरव यांना जाग आली. त्यांनी हटकल्यानंतर खवले मांजर मेल्यासारखे निपचित पडून राहिल्याने गुरव यांनी त्याला पोत्यात भरून गायीच्या गोठ्यात ठेवले. काही वेळाने मांजराने पळण्याचा प्रयत्न केला. परंतु अशक्तपणामुळे त्याला पळता येत नव्हते. त्यामुळे गुरव यांनी त्याला व्यवस्थित पोत्यात ठेवून वन विभागाचे अधिकारी कांबळे यांना मोबाईलवरून संपर्क साधून याबाबत माहिती दिली. साधारणत: मुंगसासारखा दिसणारा हा प्राणी मांजर या प्रवर्गात मोडत असून मुंग्या व किडे हे याचे प्रामुख्याने खाद्य असते. या मांजराच्या डोक्याचा, पाठीचा भाग व पायांवर धारदार खवल्याने झाकलेला असून पोटावर राठ केस आहेत. स्वसंक्षणासाठी खवले मांजर शरीराचे वेटोळे करून आपल्या शरीरावरील धारदार खवले उंचावते. असे केल्याने खवल्याच्या धारदार कडा बाहेरच्या बाजूने रोखल्या जातात. खवले टणक असल्याने व थोडासा विचित्र असा हा प्राणी दिसत असल्याने कोणीही याच्या जवळ जात नव्हते. त्यास दीपक गुरव व संजय लोखडे यांनी पकडले. (वार्ताहर)गावात दुसऱ्यांदा मिळाले दर्शनखवले मांजर हे आफ्रिका व आशिया येथील उष्ण कटिबंधामध्ये आढळते. कवठे गावामध्ये खवले मांजर सापडण्याची ही दुसरी वेळ असून शशिकांत पोळ यांच्या घराशेजारी पहिले खवले मांजर सापडले होते.