शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज मतदान

By admin | Updated: May 5, 2015 00:49 IST

प्रशासन सज्ज : २८ उमेदवारांचे भविष्य होणार पेटीबंद

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज, मंगळवारी ११ तालुक्यांतील मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान होणार आहे. २८ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. दरम्यान, ११ मतदान केंद्रांवर ८५ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. २० कर्मचारी राखीव असणार आहेत. ११ निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार दराडे यांच्या उपस्थितीत सोमवारी येथील भूविकास बँकेच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांना मतपेट्या, मतपत्रिका व इतर निवडणूक साहित्याचे वाटप केल्यानंतर हे कर्मचारी नेमून दिलेल्या तालुक्यांमध्ये रवाना झाले. या निवडणुकीत सत्ताधारी शेतकरी विकास पॅनेल विरुद्ध परिवर्तन पॅनेल ही दोन पॅनेल समोरासमोर ठाकले असून, नऊ अपक्षांनी दंड थोपटले आहेत. सातारा, खटाव, पाटण, महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघांत व खरेदी-विक्री संघ, औद्योगिक विणकर व मजूर, गृहनिर्माण हे चार मतदारसंघ बिनविरोध करून राष्ट्रवादीने निवडणुकीत आघाडी घेतली आहे. महिला राखीव, कोरेगाव सोसायटी, कृषी प्रक्रिया या तीन मतदारसंघांतही राष्ट्रवादीने बंडखोरांना थोपविण्यात यश मिळविले असल्याने या मतदारसंघातील निवडणूक म्हणजे केवळ औपचारिकता उरलेली आहे. (प्रतिनिधी)