राज्यशास्त्र परिषद बळकट करावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST2021-03-08T04:36:24+5:302021-03-08T04:36:24+5:30

राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन जिल्हा कार्यकारिणीची सभा ऑनलाईन पद्धतीने उत्साहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेत राज्य परिषदेच्यावतीने ...

Political Science Council should be strengthened! | राज्यशास्त्र परिषद बळकट करावी!

राज्यशास्त्र परिषद बळकट करावी!

राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन जिल्हा कार्यकारिणीची सभा ऑनलाईन पद्धतीने उत्साहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेत राज्य परिषदेच्यावतीने राज्यशास्त्र विषयाच्या सर्व जिल्ह्यांच्या कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्या.

परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा. सुमित पवार यांनी सर्व जिल्ह्याच्या पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन केले. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. भगवान चौधरी यांनी कोल्हापूर विभाग संघटनेचा गौरव केला. सातारा जिल्हाध्यक्ष प्रा. आशिष घार्गे, प्रा. स्वाती बर्गे, प्रा. राणी जाधव, प्रा. शीतल मस्के, प्रा. अमर लोखंडे, प्रा. रामदास ढाणे, प्रा. किरण पवार, प्रा. अधिकराव पाटील, प्रा. ज्योती सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.

कोल्हापूर विभागाचे उपाध्यक्ष प्रा. दीपक करपे यांनी परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. राज्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे, सचिव प्रा. पितांबर उरकुडे, सहसचिव प्रा. सुनील राठोड, प्रा. भारती पाटील, विभागीय अध्यक्ष प्रा. संपतराव मोरे, सदस्य प्रा. विजय बर्गे व जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक यावेळी उपस्थित होते. सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. प्रास्ताविक व स्वागत कोल्हापूर विभागाचे महासचिव प्रा. धनाजीराव देसाई यांनी केले. प्रा. वसंत गवंडी यांनी आभार मानले.

Web Title: Political Science Council should be strengthened!