शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Satara: प्रकरण आत्महत्येचे, लढाई निंबाळकरांची; राजकीय आखाड्याने चौकशी यंत्रणेवर ताण 

By हणमंत पाटील | Updated: October 31, 2025 14:28 IST

दिशा भरकटल्याने फलटणची बदनामी

हणमंत पाटीलसातारा : फलटण येथील पीडिता डॉक्टरने आत्महत्या केली. या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी करण्याच्या मागणीऐवजी फलटण शहर हा राजकीय आखाडा बनला आहे. स्थानिक पारंपरिक विरोधक असलेले विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात राजकीय लढाई सुरू झाली आहे.फलटणमधील हे दोन्ही नेते पीडिता आत्महत्या प्रकरणावरून प्रत्यक्ष कुठेही पुढे येताना दिसत नाहीत. पण ते शांत राहून स्थानिक, राज्यस्तरीय व केंद्रीय नेत्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असल्याचे फलटणकरांचे म्हणणे आहे. त्यामुळे पीडिता आत्महत्येच्या चौकशी यंत्रणेवर ताण येत असून, फलटणकरांनी नाहक बदनामी होऊ लागली आहे.गेल्या आठवड्यापासून फलटण उपजिल्हा रुग्णालयातील पीडिता डॉक्टर आत्महत्येचे प्रकरण दरदिवशी वेगळे वळण घेत आहे. याप्रकरणावरून राजकारण रंगू लागल्याने गंभीर प्रकरणातील चौकशीची दिशा भरकटण्याची भीती पीडितेचे नातेवाईक व फलटणकरांना वाटू लागली आहे.

स्थानिक राजकारण तापतेय कोण...?

एका बाजूला पोलिस यंत्रणेवर चौकशीचा ताण असताना फलटणमधील स्थानिक राजकारण दिवसेंदिवस तापत चालले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे दोन पीए (स्वीय सहायक) वारंवार पीडित महिलेला फोन करीत असल्याचा आरोप उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्यानंतर जयश्री आगवणे यांनीही पुण्यात पत्रकार परिषद घेऊन रणजितसिंह यांना लक्ष केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेलमालक दिलीपसिंह भोसले यांनी नाव न घेता, तर ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांनी थेट नाव घेत रामराजे यांना लक्ष केले. आता दोन्ही निंबाळकर यांच्या लढाईत आणखी सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते उतरण्याची शक्यता आहे.

वाचा : ज्यांना अब्रू नाही त्यांची बेअब्रू कशी?, हा संशोधनाचा विषय - रामराजे नाईक-निंबाळकर

जिल्हाधिकाऱ्यांचे 'त्या' मेळाव्यात प्रास्ताविक...पीडिता आत्महत्येच्या तिसऱ्या दिवशी फलटणमधील विविध विकासकामांच्या भूमिपूजनानंतर भाजप नेत्यांनी कृतज्ञता मेळावा घेतला. कृतज्ञता मेळावा हा राजकीय कार्यक्रम असताना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना ‘क्लीन चिट’ दिली. त्यानंतर विरोधकांनी आत्महत्याच्या घटनेवरून सत्ताधारी पक्ष व नेत्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली.प्रशासकीय यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप...

  • गेल्या काही वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने प्रशासकीय यंत्रणेत आजी-माजी आमदार, खासदार व मंत्रिमहोदयांचा हस्तक्षेप वाढला आहे.
  • ‘खादी’ आणि ‘खाकी’ एक झाल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. याच यंत्रणेमुळे शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे पीडितेने आक्षेप नोंदविले आहेत.
  • याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांची नियुक्ती केली आहे. संशयित आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने व इंजिनिअर प्रशांत बनकर यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी, पोलिस कोठडी व न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
  • दुसऱ्या बाजूला या प्रकरणावरून फलटणमध्ये राजकीय आखाडा तयार झाल्याने त्याचा ताण पीडितेच्या आत्महत्येच्या चौकशीच्या प्रकरणावर येऊ लागला आहे. 

फलटणकरांना पडलेले प्रश्न...

  • स्थानिक नेत्यांच्या विरोधातील कागदपत्रे मुंबईतील नेत्याकडे कशी?
  • माजी खासदार दोषी नव्हते, तर मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट का दिली?
  • आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआय व एसआयटीकडे का नाही?
  • प्रकरण न्यायप्रविष्ट असताना नेत्यांची राजकीय जाण व भान कुठेय?
English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Suicide case turns political arena, straining investigation.

Web Summary : Doctor's suicide in Satara's Phaltan becomes political battleground between rival Nimbalakars. Accusations fly, hindering investigation. Political interference in administration adds pressure, raising questions about justice.