शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळला मिळालं हक्काचं पोलीस ठाणे!

By admin | Updated: August 14, 2015 21:49 IST

आज शुभारंभ : खंडाळा ठाण्याच्या अखत्यारीत आता २७ गावे

सातारा : खंडाळा तालुक्यातील शिरवळला हक्काचं पोलीस ठाणे मिळाले आहे. या पोलीस ठाण्याचे उद्घाटन पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते शनिवारी (दि. १५) होणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.शिरवळ पोलीस ठाण्याच्या निर्मितीमुळे खंडाळा पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील तीस गावांचा समावेश शिरवळ ठाण्याच्या हद्दीत होणार असून, खंडाळा ठाण्याच्या हद्दीत २७ गावे उरणार आहेत. शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरवळ, भादे, पळशी, अतीट, भोळी, भाटघर, धनगरवाडी, गावडेवाडी, गुठाळे, कान्हवडी, कवठे, केसुर्डी, लोणी, मिरजे, मिरजेवाडी, नायगाव, पिसाळवाडी, राजेवाडी, शिंदेवाडी, शेखमीरवाडी, सांगवी, तोंडल, वडगाव, विंग, वडवाडी, हरताळे, होडी, माने कॉलनी, साळव (पुनर्वसन), देवघर (पुनर्वसन) या गावांचा समावेश आहे.खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्नवाडी, जवळे, लोहोम, घाडगेवाडी, झगलवाडी, लिंबाचीवाडी, भादवडे, शिवाजीनगर, बावडा, पारगाव, खंडाळा, म्हावशी, वाण्याचीवाडी, अजनुज, अंबारवाडी, असवली, पवारवाडी, भोसलेवाडी, बेंगरुटवाडी, कन्हेरी, मोरवे, अहिरे, धावडवाडी, हरळी, घाटदरे, वहागाव (पुनर्वसन) अहिरे, वहागाव (पुनर्वसन) अजनुज या गावांचा समावेश आहे.समारंभास खासदार उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार प्रभाकर घार्गे, आ. आनंदराव पाटील, आमदार महादेव जानकर, आमदार नरेंद्र पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)..ताण होणार कमीपुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा तालुक्यातील खंबाटकी बोगदा, घाट परिसरात वारंवार अपघात घडत होते. त्यामुळे खंडाळा पोलीस ठाण्यात ताण येत होता. अपुरे मनुष्यबळ यामुळे पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी शिरवळला स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे, अशी मागणी वारंवार होत होती. यामुळे आता ताण कमी होणार आहे.