शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

बालचमूंच्या कुंचल्यातून साकारली चित्रे

By admin | Updated: September 15, 2014 23:25 IST

चित्रकला स्पर्धा : विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; चित्रांतून दिला सामाजिक संदेश

कऱ्हाड : गुरुकुल प्री-स्कूल आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेला बालचमूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘लोकमत बालविकास मंच’ माध्यम प्रायोजक होते. नगरपालिका शाळा क्र. ३ मध्ये आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये सकाळी एक वाजल्यापासूनच मुलांसोबत पालकांनी हजेरी लावली. बाराशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. वेगवेगळ्या गटातील बालचमूंनी आपल्या अफाट कल्पनाशक्तीने अतिशय सुंदर चित्रे रेखाटली होती. भले-भले लोक त्यांच्या कल्पनाशक्तीच्या मागे पडतील, अशी कल्पकता मुलांमध्ये असते, हे यानिमित्ताने समोर आले.या स्पर्धेसाठी मुलांबरोबर पालकही तेवढ्याच उत्साहाने आले होते. लहान गटामध्ये मुलांना देण्यात आलेल्या ‘छोटा भीम’ या चित्रामध्ये वेगवेगळे आकर्षक रंग भरून बालचमूंही रंगामध्ये रंगून गेले होते. द्वितीय गटामध्ये चित्रमर्यादा नसल्यामुळे कोणी निसर्गचित्र, तर कोणी आकाशातील तारे, तर कोणी पऱ्यांची दुनिया चित्राच्या माध्यमातून सत्यात आणली. तृतीय गटामध्ये माझ्या स्वप्नातले घर साकारताना कोणी राजवाडा, तर कोणी खेडे गावातील झाडे-झुडपांमध्ये नटलेले घर काढले. अनेकांना शहरामधील घरांचे आकर्षण या निमित्ताने दाखवून दिले. समुद्रकिनारी एक छोटी झोपडी बांधून राहावे आणि या धावपळीच्या जीवनातून मुक्त व्हावे, असा संदेश काहीनी दिला. स्त्रीभ्रूणहत्या करू नये, म्हणून चित्रामधून मुलींनी संदेश दिला. या स्पर्धेच्या रूपाने आज आधुनिक युगातील मुले आपल्या आयुष्यात काय रंग भरतात, हे समोर आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण नगरपालिका शाळा नं. ३ चे मुख्याध्यापक अर्जुन कोळी, गुरुकुल स्कूलचे चेअरमन अजित डांगे आणि स्पर्धेचे परीक्षक मिलिंद पाटील, अमोल गवळी यांच्या हस्ते झाले. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ड्रॉइंग किट देऊन गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)विजेते स्पर्धकलहान गट : जिया पासद, आदिती पोरे, यासी मुथा, वेदिका ढाणे, तेजस हजारे, पायल शहा, स्वरांजली जगदाळेमध्यम गटराजनंदिनी कांबळे, विनीत जैन, प्रतीक यादव, संकेत मनियार, साईनाथ जाधव, वैष्णवी शहाणे, सार्थक भोईमोठा गटजैना भंडारी, साहिल जैन, मारुती जाधव, श्रध्दा माने, शिवानी खटावकर, वेदांत लोहार, तुळशी माटेकरकार्यक्रम ठिकाणी ‘बालविकास मंच’ सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुलांबरोबर पालकांनीही यामध्ये सहभाग नोंदवला. फक्त १५० रूपये वार्षिक सभासद नोंदणी शुल्क भरून २५४ रुपये किमतीच्या भेटवस्तू, लकी ड्रॉ मध्ये सहभागी आणि ‘छोटा भीम’ला भेटण्याची संधी यानिमित्ताने मुलांना मिळत आहे.आजच सभासद होवून ‘छोटा भीम’ बालनाट्याचे पास मोफत मिळवावेत, असे आवाहन ‘लोकमत बालविकास मंच’तर्फे करण्यात आले आहे.