शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

भरवस्तीत शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला, नांदलापुरात घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:10 IST

बिबट्याने हल्ला करीत तीन शेळ्या ठार केल्या. नांदलापूर, ता. कऱ्हाड  येथील राजाराम शिर्के यांच्या वस्तीवर मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, भरवस्तीत बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढविल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे भरवस्तीत शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला, नांदलापुरात घटना तीन शेळ्या ठार; शेतकऱ्यांसमोरच धुमाकूळ

मलकापूर : बिबट्याने हल्ला करीत तीन शेळ्या ठार केल्या. नांदलापूर, ता. कऱ्हाड  येथील राजाराम शिर्के यांच्या वस्तीवर मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, भरवस्तीत बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढविल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आगाशिव डोंगर पायथ्याला नांदलापूर गावालगत शिर्के मळा आहे. या मळ्यात राजाराम विष्णू शिर्के, सरपंच रमेश शिर्के यांच्यासह काही शेतकऱ्यांच्या वस्त्या आहेत. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता सरपंच रमेश शिर्के हे वस्तीवर असताना काही अंतरावरून बिबट्या गेल्याचे त्यांना दिसले. त्यांनी याबाबत आसपासच्या शेतकऱ्यांना सांगितले. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेऊन बिबट्याचा शोध सुरू केला.

रमेश शिर्के यांच्या शेडपासून काही अंतरावर साई मंगल कार्यालयाजवळ राजाराम शिर्के यांचे जनावरांचे शेड आहे. जनावरांच्या शेडात त्यांनी सहा शेळ्या व दोन म्हैस बांधली होती. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे शिर्के यांनी शेळ्यांसह म्हैस शेडमध्ये बांधून ते गावात गेले.

रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वस्तीनजीक बिबट्या दिसल्याचे समजल्यावर राजाराम शिर्के वस्तीवर गेले. त्यावेळी शेळ्या व जनावरे ओरडत असलेला आवाज त्यांना आला. त्यावेळी बिबट्याचा शोध घेणाऱ्या शेतकऱ्यांसह राजाराम शिर्के यांनीही वस्तीकडे धाव घेतली असता बिबट्या शेळ्यांवर हल्ला करीत असल्याचे त्यांना दिसले. सर्वांनी आरडाओरडा करताना बिबट्याने नजीकच्या शेतात धूम ठोकली.बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या. तर एक शेळी जखमी झाली. जखमी शेळीसह इतर बचावलेल्या दोन अशा तीन शेळ्या घेऊन राजाराम शिर्के घरी घेऊन गेले. शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती वनविभागासह पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह वनपाल ए. सी. सव्वाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनाधिकाऱ्यांनी मृत शेळ्यांचा व घटनास्थळाचा पंचनामा केला.

 

 

टॅग्स :leopardबिबट्याSatara areaसातारा परिसर