विवाहितेचा चारित्र्यावरून छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:42 IST2021-09-27T04:42:42+5:302021-09-27T04:42:42+5:30

सातारा : विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन जाचहाट केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...

Persecution of marital character | विवाहितेचा चारित्र्यावरून छळ

विवाहितेचा चारित्र्यावरून छळ

सातारा : विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन जाचहाट केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

धीरज शिवाजी इथापे, सुनीता शिवाजी इथापे, शिवाजी बापूसो इथापे, (सर्व रा. अमृत काॅलनी, दाैलतनगर, सातारा), श्रद्धा गणेश गोडसे (रा. पुणे), प्रियांका सोमनाथ मांढरे (रा. डोंबिवली, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहिता प्रगती धीरज इथापे (वय २७, रा. चिंधवली, ता. वाई, सध्या रा. पाली, ता. कऱ्हाड) यांचा चारित्र्याचा संशय घेऊन छळ करण्यात आला. तसेच स्त्रीधन परस्पर बॅंकेत गहाण ठेवून त्यावर १० लाख रुपये कर्ज काढले. हे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, या कारणासाठी प्रियांका हिचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला.

Web Title: Persecution of marital character