शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाटण बाजार समिती निवडणुकीत पाटणकरांचीच ‘जीत’!

By admin | Updated: August 24, 2015 23:15 IST

राष्ट्रवादीच्या पॅनेलने सर्वच्या सर्व १९ जागा जिंकून विजय मिळविला आहे

पाटण : पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पॅनेलने सर्वच्या सर्व १९ जागा जिंकून विजय मिळविला आहे. पाटण बाजार समिती निवडणुकीतही विधानसभेचा करिष्मा दाखवू, या आत्मविश्वासाने रणांगणात उतरलेल्या विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांच्या पॅनेलने सपशेल नांगी टाकली. या निवडणुकीत किमान ग्रामपंचायत मतदारसंघातील चारही जागा आपण पटकावून पाटणकर गटाची एकहाती सत्ता असलेल्या बाजार समितीत शिरकावकरू, अशी अपेक्षा देसाई गटाची होती. मात्र, तसे न होता सोसायटी मतदारसंघात सरासरी दोनशे मते, ग्रामपंचायत मतदारसंघात ९० मते, व्यापारी मतदारसंघात २२५ मतांच्या फरकांनी पाटणकर गटाने सर्वच्या सर्व जागांवर बाजी मारली. यापूर्वी पणन प्रक्रिया व हमाल-मापाडीमधून पाटणकर गटाचे जे. व्ही. जाधव, आनंदराव पवार हे बिनविरोध निवडून आले होते. सोमवारी झालेल्या मतमोजणीत मतदारसंघ व विजयी उमेदवार असे : सोसायटी मतदार संघ : अरविंद जाधव, अधिक माने, राजाराम मोरे, सुहास माने, विक्रमसिंह पाटणकर, सुभाष पाटील, दादासाहेब यादव, शहाबाई यादव, रेखा पाटील, शंकर सपकाळ, श्रीरंग मोहिते. ग्रामपंचायत मतदारसंघ : अभिजित जाधव, उत्तम जाधव, आनंदा डुबल, सीताराम मोरे. व्यापारी : रामदास कदम, शरद राऊत. पाटणकर गटात चैतन्याची लाट पाटण बी.एड. कॉलेजवर सोमवारी दुपारी एक वाजता मतमोजणी झाली. दरम्यान, मतमोजणी केंद्राच्या गेटवर पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. निकाल जसजसे बाहेर येतील, तसतसे फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत होते. त्यातच गटाचे सत्यजित पाटणकर व विक्रमबाबा पाटणकर यांचे आगमन होताच विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मतमोजणी केंद्रापासून शहरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.