Satara: मुलांचं गप्प राहणं हाच गुण ‘त्यानं’ हेरला; शाळेत पहाटेच्या अंधारात अश्लील कृत्य, केअरटेकरच्या विकृत कारनाम्याने पालक हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:15 IST2026-03-11T16:15:02+5:302026-03-11T16:15:24+5:30

सर्वाधिक सहावीतील मुलांवर ‘त्याची’ नजर

Parents were shocked to hear about the exploits of a caretaker who mentally and sexually harassed children at a renowned school in Satara city | Satara: मुलांचं गप्प राहणं हाच गुण ‘त्यानं’ हेरला; शाळेत पहाटेच्या अंधारात अश्लील कृत्य, केअरटेकरच्या विकृत कारनाम्याने पालक हादरले

Satara: मुलांचं गप्प राहणं हाच गुण ‘त्यानं’ हेरला; शाळेत पहाटेच्या अंधारात अश्लील कृत्य, केअरटेकरच्या विकृत कारनाम्याने पालक हादरले

सातारा : सातारा शहरातील एका नामांकित शाळेतील तब्बल २४ मुलांचा मानसिक व लैंगिक छळ करणाऱ्या विकृत केअरटेकरचे कारनामे ऐकून पालक अक्षरश: हादरून गेले आहेत. या केअरटेकरने हे अश्लील व धमकीचे सारे कारनामे पहाटेच्या अंधारात केले. जी मुले शांत व गप्प राहत होती. अशी मुले हेरून तो आपला सावज करायचा.

केअरटेकरने छळ केलेली सर्वाधिक मुले ही सहावी इयत्तेतली आहेत. काही मुले सातवी आणि नववीतील सुद्धा आहेत. ही सर्व मुले वर्षभरापासून केअरटेकरच्या अश्लील हरकती गप्प गुमान सहन करत होती. याची वाच्यता केली तर आपल्याला शाळेतून काढून टाकले जाईल, याची भीती मुलांना वाटायची. त्यामुळे कोणीही तक्रारीसाठी पुढे आले नाही; परंतु एका मुलाने धाडस करून आपल्या वडिलांना संबंधित केअरटेकरच्या घृणास्पद कृत्याविषयी भीतभीत सांगितले. तेव्हा एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित शाळेत असा प्रकार घडतोय, याचा पालकांना सुरुवातीला विश्वास बसला नाही. 

परंतु तो मुलगा जेव्हा रडत रडत सांगू लागला तेव्हा पालकांनी तातडीने मुलाला विश्वासात घेऊन धीर दिला. तत्काळ संबंधित शाळेच्या प्राचार्यांना याची कल्पना दिली. अत्यंत गोपनीय पद्धतीने पोलिसशाळा व्यवस्थापनाने चाैकशी केल्यानंतर केअरटेकरच्या कृत्याला २४ मुले बळी पडल्याचे समोर आले. या प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या प्रकारे त्याच्याकडून त्रास सुरू होता. आता या प्रकारामुळे इतर मुलांचे पालक धास्तावले आहेत. आपला मुलगा त्या शाळेत सुरक्षित राहील का, याची चिंता अनेक पालकांना लागली आहे.

‘तो’ २६ वर्षांचा अविवाहित तरुण!

संबंधित केअरटेकर २६ वर्षांचा असून, तो अविवाहित आहे. गेल्या चार वर्षांपासून तो त्या शाळेत काम करत आहे. पूर्वी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती का, याची माहिती आता पोलिसांकडून घेतली जात आहे. या प्रकारामुळे संबंधित केअरटेकरला तातडीने नोकरीवरून शाळा प्रशासनाने काढून टाकल्याचे पोलिस सांगताहेत.

Web Title : सतारा: स्कूल के केयरटेकर ने 24 बच्चों का यौन उत्पीड़न किया; माता-पिता स्तब्ध

Web Summary : सतारा के एक स्कूल के केयरटेकर ने 24 बच्चों का यौन शोषण किया, जो सुबह के अंधेरे में चुप रहने वाले छात्रों का शिकार करते थे। छठी कक्षा के छात्रों को मुख्य रूप से निशाना बनाया गया। निष्कासन के डर से पीड़ित चुप रहे जब तक कि एक ने साहसपूर्वक बात नहीं की, जिसके कारण केयरटेकर को बर्खास्त कर दिया गया और पुलिस जांच शुरू हुई।

Web Title : Satara School Caretaker Molests 24 Children; Parents Horrified by Actions

Web Summary : A Satara school caretaker sexually abused 24 children, preying on quiet students in the early morning darkness. Sixth-grade students were primarily targeted. Fear of expulsion kept victims silent until one bravely spoke out, leading to the caretaker's dismissal and police investigation.