शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींच्या अपघातात पेंटरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:14 IST

कऱ्हाड : दोन दुचाकींच्या अपघातात पेंटरचा मृत्यू झाला. पाचवडफाटा, ता. कऱ्हाड येथे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना ...

कऱ्हाड : दोन दुचाकींच्या अपघातात पेंटरचा मृत्यू झाला. पाचवडफाटा, ता. कऱ्हाड येथे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एकावर कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पंढरीनाथ मारुती पाटील (रा. गिरजवडे, ता. शिराळा, जि. सांगली) असे अपघातात मृत झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जगदीश चंद्रदेव प्रसाद (वय ३२, सध्या रा. नांदलापूर, मूळ रा. पकडीलाता, ता. सिलेमपूर, उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपघातावेळी जगदीश प्रसाद हा मद्यधुंद स्थितीत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. मृत पंढरीनाथ यांचा मुलगा प्रतीक याने याबाबतची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरजवडे येथील पंढरीनाथ पाटील हे पेंटर होते. ते कऱ्हाडात पेंटींगचे काम करीत होते. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कऱ्हाडला कामावर आले होते. काम संपल्यानंतर परत घरी जात असताना पाचवडफाटा येथे पेट्रोल पंपाच्या वळणावर त्यांच्या दुचाकीला (क्र. एमएच १० डीडी १२१९) दुसऱ्या दुचाकीने (क्र. एमएच ५० एस ३३६४) धडक दिली. त्यामध्ये पंढरीनाथ पाटील हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलिसात झाली आहे. उपनिरीक्षक अशोक भापकर तपास करीत आहेत.