शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

पाडळोशी तलाठ्यांना ‘पळता भुई थोडी’!

By admin | Updated: July 13, 2014 22:28 IST

तीन सजांचा भार : मल्हारपेठच्या मंडलाधिकाऱ्यांकडे चाफळचा ‘चार्ज’

चाफळ : विभागात महसूल खात्याचा सावळागोंधळ सुरू आहे. वर्षभरापासून विभागातील तलाठ्यांच्या वारंवार बदल्या केल्या जात आहेत. एका तलाठ्याकडे अनेक गावांचा चार्ज असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. चाफळ विभागाची भौगोलिक परिस्थिती पाहता बहुतांश गावे डोंगरकपारीत वसल्याचे दिसून येते. विभागात एकूण २२ गावे व २३ वाड्या-वस्त्यांचा समावेश होतो. चाफळ मंडलामध्ये सहा सजांचा समावेश आहे. सध्या येथील एका कर्मचाऱ्यावर तीन सजांचा कार्यभार सोपविल्याने त्याची अवस्था बिकट झाली आहे. यातच मंडल अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचेही पद रिक्त आहे. चाफळ मंडलामध्ये डेरवण, चाफळ, नाणेगांव बुद्रुक, पाडळोशी, उरूल, वजरोशी या सहा सजांचा समावेश होतो. यातील चाफळच्या तलाठ्यांना एक वर्ष होतेय ना होतेय तोच त्यांची कऱ्हाड तालुक्यातील कार्वे येथे बदली करण्यात आली. सर्वच शासकीय खात्यांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीन वर्षांनंतर होतात. मग चाफळच्या या तलाठ्यांची एका वर्षातच बदली का झाली, असा प्रश्न ग्रामस्थांना सतावू लागला आहे. नाणेगाव बुद्रुकचे तलाठी रजेवर असल्याने त्यांचा व चाफळच्या तलाठ्यांचा अतिरिक्त कार्यभार पाडळोशी सजाच्या तलाठ्यांना सोपवण्यात आल्याने त्यांना पळताभुई थोडी झाली आहे. यातच भरीस भर पडून मंडलाधिकारीही सेवानिवृत्त झाल्याने त्यांचीही जागा रिक्त पडली आहे. त्यांचा तात्पुरता कार्यभार मल्हारपेठच्या मंडलाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याचे समजते. एकूणच चाफळ मंडलामध्ये ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ या उक्तीप्रमाणे महसूल विभागाचा कारभार सुरू आहे. विभागातील लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून प्रत्येक सजासाठी स्वतंत्र व सक्षम कर्मचऱ्यांच्या नेमणुका करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)