जिल्हा रुग्णालयास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST2021-06-03T04:28:13+5:302021-06-03T04:28:13+5:30

सातारा : कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन, पुण्याच्यावतीने सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष ...

Oxygen concentrator machine to district hospital | जिल्हा रुग्णालयास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन

जिल्हा रुग्णालयास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन

सातारा : कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन, पुण्याच्यावतीने सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र जाधव यांच्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द करण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष उल्हास देसाई, मारुतराव निकम व बँक कर्मचारी प्रसाद किरपेकर, गुरुदास भागवत, प्रदीप पाटील, उत्कर्ष शिंदे, यतीन महाजन, पिंटो पिसाळ, वैभव साळुंखे, गोपाळ शिंदे, बंडू भंडलकर, बाळकृष्ण फडतरे उपस्थित होते. बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन, पुणेच्या कार्यक्षेत्रातील १३ जिल्ह्यांमधील प्रत्येक जिल्हा सरकारी रुग्णालयास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर संघटनेच्यावतीने देणगी स्वरुपात देण्यात येत आहे. संघटना सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर राहिली आहे.

फोटो : ०२ फोटो

बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन, पुणेच्यावतीने सातारा जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले.

Web Title: Oxygen concentrator machine to district hospital