शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

हमारा प्लास्टर तो पिघलता है !

By admin | Updated: July 3, 2014 00:53 IST

राजस्थानी मूर्तिकारांचा दावा : जलरंगांनी रंगविणार ‘चॉक पावडर’च्या गणेशमूर्ती

सातारा : प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणि त्यामुळं होणारं जलप्रदूषण या विषयावर बोलताना अनेकांनी महामार्गावरील राजस्थानी मूर्तिकारांकडे बोट दाखवलं. यासंदर्भात या कलाकारांशी संपर्क साधला असता ‘ हमारा पलास्टर तो पिघलता है’ असा दावा त्यांनी केला. आम्ही ‘चॉक पावडर’च्या मूर्ती तयार करून आपण त्या जलरंगांनी रंगवितो, असं त्यांनी ‘लोकमत’ला सांगितलं.
‘लोकमत’ने मंगळवार तळे परिसरातील प्रदूषणाचा विषय उचलून धरताच अनेकांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला असून, शाडूच्या गणेशमूर्तींची आगाऊ नोंदणी करणे सुरू झाले आहे. शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना जास्तीत जास्त संख्येनं करून प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील अनेक घटक सरसावले आहेत. सामाजिक आणि पर्यावरणवादी संस्थांनी सक्रिय पुढाकार घेऊन याविषयी प्रबोधन सुरू केलं आहे. पालिकेच्या सभागृहात घालेल्या बैठकीत शहरातील मूर्तिविक्रेत्यांनी महामार्गावर मिळणाऱ्या गणेशमूर्ती पर्यावरणासाठी अत्यंत घातक असतात, असा मुद्दा उपस्थित करून या मूर्ती शहरात आणू देऊ नयेत, अशी मागणी केली गेली होती. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या या मूर्तींना घातक रासायनिक रंग लावलेले असतात, असे प्रतिपादन अनेकांनी केले होते.
या पार्श्वभूमीवर या विक्रेत्यांची भेट घेतली असता, त्यांनी मूर्ती प्लास्टरच्या असतात, ही बाब मान्य केली. मात्र, प्लास्टरमधील प्रकार त्यांनी सांगितले. नंबर एक, दोन आणि तीन असे हे प्रकार आहेत. तीन नंबरच्या प्लास्टरला ‘चॉक पावडर’ म्हणतात. आपण याच प्लास्टरच्या मूर्ती करतो, असे त्यांनी सांगितले. या मूर्ती पाण्यात विरघळणाऱ्या असतात, असा दावाही त्यांनी केला. ‘आमच्या मूर्तींना कोणताही रासायनिक रंग लावला जात नाही. नेल पॉलिशचा वापर केला जात नाही. सोनेरी रंग हाच एकमेव तैलरंग आम्ही वापरतो. बाकीचे सर्व जलरंग वापरतो. पाण्याचा स्पर्श होताच ते धुऊन निघतात,’ असे त्यांनी सांगितले. ‘मूर्ती रंगविताना ‘थिनर’चा वापर करीत नसल्यानेच आमच्या मूर्तींना चमक नसते. शिवाय पीतांबर रंगविताना वापरण्यात येणारी चकमकही आम्ही वापरत नाही,’ असे त्यांनी नमूद केले.
या मूर्ती इतर मूर्तींच्या तुलनेत स्वस्त का असतात, असा प्रश्न विचारला असता मूर्तिकार म्हणाले, ‘गणेशमूर्तींच्या कारखान्यांमध्ये शिल्लक मूर्ती ठेवण्यास जागा असते. आम्ही भटकंती करून मूर्ती विकतो. शिल्लक मूर्ती ठेवायला जागा नसते. त्यामुळे दरात कमी-जास्त करून आम्ही विक्री करतो. शिवाय आमच्या मूर्ती कारखान्यात तयार होणाऱ्या मूर्तींपेक्षा पातळ असतात. त्यामुळे प्लास्टर कमी लागते.’
दरम्यान, या मूर्तिकारांचे म्हणणे खरे असल्याचे पडताळण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करतात. (लोकमत टीम)