शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील ज्योतिषाला एक महिन्याची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 11:42 IST

भानामती, भूत, हडळ, मुलगाच होईल, मुलगी होणार नाही, अशा भूलथापा मारून लोकांकडून पैसे उकळणाऱ्या विश्वास भालचंद्र दाते (रा. जोशीवाडा यादोगोपाळ पेठ, सातारा) या ज्योतिषाला मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांनी एक महिना सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, दंड न दिल्यास सात दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देसाताऱ्यातील ज्योतिषाला एक महिन्याची शिक्षाभूलथापा मारून लोकांकडून पैसे उकळले

सातारा : भानामती, भूत, हडळ, मुलगाच होईल, मुलगी होणार नाही, अशा भूलथापा मारून लोकांकडून पैसे उकळणाऱ्या विश्वास भालचंद्र दाते (रा. जोशीवाडा यादोगोपाळ पेठ, सातारा) या ज्योतिषाला मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांनी एक महिना सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, दंड न दिल्यास सात दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली.या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, ज्योतिष विश्वास दाते याने यादोगोपाळ पेठेमध्ये श्री दत्त ज्योतिष कार्यालय सुरू केले होते. कॅन्सर, एड्स अशा ७२ व्याधींवर खात्रीशीर इलाज केले जातील, असे तो सांगत होता. प्रत्येक आजारावर वेगवेगळे औषध देऊन लोकांकडून तो पैसे उकळत होता.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मुराद पटेल (रा. शिरवळ) यांनी १४ मार्च २०१५ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात विश्वास दाते याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पोलिसांनी दातेला अटकही केली होती. सहायक फौजदार शेडगे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने विश्वास दाते या ज्योतिषाला एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.सरकारी वकील पुष्पा जाधव-माने यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना पोलीस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे सहायक फौजदार शशिकांत भोसले, एस. जी. जाधव यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर