ठळक मुद्देमहिलेच्या पर्समधील एक लाखाचे दागिने लांबविले सातारा बसस्थानकातील प्रकार
सातारा : बसमधून उतरत असताना अज्ञाताने महिलेच्या पर्समधील सुमारे पाच तोळ्याचे एक लाखाचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना सातारा बसस्थानकात दि. ९ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.उर्मिला लक्ष्मण पवार (वय ५६, रा. बोरवली, इस्ट मुंबई) या पतीसोबत वाई-सातारा विनाथांबा बसमधून सातारा बसस्थानकात आल्या. बसमधून उतरत असताना त्यांच्या खांद्याला अडकवलेल्या पर्समधून अज्ञात चोरट्याने पर्सची चैन उघडली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}त्यानंतर पर्समधील पाच तोळ्याचे मंगळसूत्र आणि रोकड चोरट्याने हातोहात लांबविली. हा प्रकार त्यांच्या काहीवेळानंतर लक्षात आला. मात्र, तोपर्यंत चोरटा पसार झाला होता.