शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारीसाठी गेलेल्या वृद्धाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 17:03 IST

शिरवळ : शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील गावडेवाडी रोडलगत असणाऱ्या चिरेबंदी ओढ्यात मासेमारी करण्याकरिता गेलेल्या कातकरी समाजातील वृद्धाचा विजेचा ...

ठळक मुद्देमासेमारीसाठी गेलेल्या वृद्धाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू शिरवळ येथील घटना : शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात

शिरवळ : शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील गावडेवाडी रोडलगत असणाऱ्या चिरेबंदी ओढ्यात मासेमारी करण्याकरिता गेलेल्या कातकरी समाजातील वृद्धाचा विजेचा धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री सातच्या दरम्यान उघडकीस आली. काळू बारकू जाधव (वय ६०, रा. कातकरीवस्ती, पवारवस्तीलगत, शिरवळ, ता. खंडाळा) असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरवळ (ता. खंडाळा) येथील कातकरीवस्ती या ठिकाणी राहणारे काळू जाधव हे (पळशी, ता. खंडाळा) गावच्या हद्दीत असणाऱ्या चिरेबंदी ओढ्यात मासेमारी करण्याकरिता गेले होते.

दरम्यान, ते दुपारी उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांचे कुटुंबीय व मित्र हे शोध घेत होते. शिरवळ-पळशी रोडवरील गावडेवाडी रस्त्यावरील शेजारी असणाऱ्या चिरेबंदी ओढ्यामध्ये काळू जाधव हे निपचित पडल्याचे निदर्शनास आले. या वेळी कुटुंबीयांनी तत्काळ याबाबतची शिरवळ पोलीस स्टेशनला माहिती देताच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जयवंत घोरपडे व कुटुंबीयांनी शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.या वेळी मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतची फिर्याद दगडू जाधव यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून, आकस्मिक मयत म्हणून नोंद झाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर