शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेला ‘आयकर’ची पाच कोटी भरण्याची नोटीस

By admin | Updated: August 24, 2016 00:28 IST

जुने प्रकरण : प्रोत्साहन अनुदानावर लावला कर

सांगली : जिल्हा बॅँकेने जिल्ह्यातील शाखांना दिलेल्या ११ कोटींच्या प्रोत्साहन अनुदानावर पाच कोटी आयकर भरण्याची नोटीस आयकर विभागाने पुन्हा बजावली आहे. याप्रकरणी आता जिल्हा बॅँक आयकर विभागाच्या पुण्यातील कार्यालयाकडे अपील करणार आहे. जिल्हा बॅँकेने २०१२-१३ या आर्थिक वर्षात शाखांना ११ कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले होेते. एकूण नफ्यातून या अनुदानाचे वाटप करण्यात आले होते. याशिवाय निव्वळ नफ्यावर पुन्हा आयकरचा भरणा केला होता. रितसर कर भरल्यानंतर पुन्हा आयकर विभागाने प्रोत्साहन अनुदानावर कर भरण्याची नोटीस बजावली होती. अनुदानावर रितसर ३० टक्के आयकर आणि त्यावर दंड अशी एकूण पाच कोटी रुपये भरण्याची सूचना त्यांनी दिली आहे. याच कराविषयी आयकर विभागाने दुसरी नोटीस जिल्हा बॅँकेला पाठविली आहे. प्रोत्साहन अनुदानावर कर लागू होत नाही, असे बॅँक प्रशासनाचे म्हणणे आहे. यापूर्वी हे म्हणणे आयकर विभागासमोर मांडण्यातही आले आहे. कराचा हा वाद गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. अद्याप तो निकालात निघाला नाही. दुसरी नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यास उत्तर देण्यात येणार आहे. बॅँकेमार्फत आता आयकर विभागाच्या पुणे कार्यालयाकडे दाद मागण्याची तयारी सुरू आहे. एकूण नफ्यातून ही रक्कम देण्यात आली असली, तरी बॅँकेच्या तो प्रक्रियेचा भाग आहे. शाखांच्या सक्षमीकरणासाठी निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. त्याच उद्देशाने प्रोत्साहन अनुदान देण्यात आल्याबाबत बॅँकेने स्पष्टीकरण दिले आहे. आता पुन्हा याच मुद्यावर आता लढाई सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)यंदाही विक्रमी आयकर बँकेच्या इतिहासात आजवर सर्वाधिक नफा चालूवर्षी झाला. ढोबळ नफा ८४ कोटी ७० लाख इतका झाल्याने २३ कोटींचा आयकर बॅँकेने भरला आहे.