शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडातील रस्त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कऱ्हाडातील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी ५० लाख एवढा भरीव ...

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कऱ्हाडातील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी ५० लाख एवढा भरीव निधी मंजूर झाला आहे. कऱ्हाड ते विटा हा मार्ग कऱ्हाड शहरातून जात असून, कोल्हापूर नाका ते कृष्णा पुलापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना प्रवास करताना गैरसोयीचे ठरत होते, तर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने या मार्गावरील वाहनांसाठी अडथळा निर्माण होऊन शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत होती. त्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. या मागणीनुसार खासदार श्रीनिवास पाटील यांनी हा भरीव निधी मंजूर करून घेतला आहे.

सध्या या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. शुक्रवारी खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली. तसेच नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने या कामाचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी जयंत पाटील, जयंत बेडेकर, सारंग पाटील, रणजितसिंह पाटील, पोपटराव साळुंखे, सद्दाम आंबेकरी, शिवाजीराव पवार, गंगाधर जाधव, प्रशांत शिंदे, अनिल धोत्रे व उपअभियंता निखिल पानसरे उपस्थित होते.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे कऱ्हाड शहरातील या रस्त्यावरील रहदारी बंद असल्याने सदरच्या कामास गती मिळाली आहे. तसेच कामाची गुणवत्ता उत्तम असून, हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

फोटो : २२केआरडी०५

कॅप्शन : कऱ्हाडातील कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका यादरम्यानच्या रस्त्याची पाहणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली.