शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांवर काळाचा घाला : नऊ जखमी, मृतांत तीन महिलांसह दोन बालके

By admin | Updated: June 10, 2015 22:52 IST

मनमाडनजीक तिहेरी अपघातात नऊ ठार

मनमाड/मालेगाव : अजमेर येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परतणाऱ्या प्रवाशांचा टेम्पो, मारुती व्हॅन आणि मालट्रक यांच्यामध्ये झालेल्या तिहेरी भीषण अपघातात नऊ जण जागीच ठार तर नऊ जण जखमी झाले. मनमाडनजीक कानडगाव शिवारात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातातील मृतांमध्ये तीन महिलांसह दोन बालकांचा समावेश आहे.मनमाड-मालेगाव मार्गावरील चोंढी घाटानजीक कानडगाव शिवारात मनमाडकडून मालेगावकडे जात असलेल्या मालट्रकला समोरून भरधाव येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने जोरदार धडक दिली. ट्रकच्या मागे मनमाड रेल्वेस्थानकावरून पंचवटी एक्स्प्रेसमधून उतरलेले प्रवासी घेऊन जात असलेली मारुती व्हॅन ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना या अपघातग्रस्त वाहनांवर जाऊन आदळली. टेम्पोमध्ये अजमेर दर्ग्याच्या यात्रेवरून येणारे प्रवासी बसलेले होते. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये टेम्पो व मारुती व्हॅनचा चक्काचूर झाला. अपघातात टेम्पोतील प्रवासी आतिक रमजान तांबोळी (३५), नाजमीन आतिक तांबोळी (१६), दोघेही रा. मनमाड, सायमा निसार तांबोळी (८), हसीना रशीद तांबोळी (५५), तन्वीर निसार तांबोळी (६), रा. कोळगाव थडी कोळपेवाडी तसेच मारुती व्हॅनमधील अब्दुल कुद्दुस हाजी मोहंमद शफी (५८) रा. गल्ली नं. १४, नयापुरा मालेगाव, मोहंमद आरीफ मोहंमद फारुक इरशत (४२) रा. किल्ला मालेगाव, चालक प्रशांत सुरेश महाजन (खैरनार), तिघे रा. मालेगाव, विशाल गणेश शेटे (३६), रा. विद्युतनगर, धुळे हे नऊ जण जागीच ठार झाले, तर नऊ जण जखमी झाले. जखमींमध्ये मुमताज रमजान तांबोळी (६५), शबाना आतिक तांबोळी (३२), सानिया आतिक तांबोळी (१३) तिघे रा. मनमाड, निसार रशीद तांबोळी (२०) , निलोफर तांबोळी (२५), अन्सार रशीद तांबोळी (३०) तिघेही रा. कोळपेवाडी, मोहमद अरीफ मो. बशीर (३०), इरफान अब्दुल मजीद (३२), रा. मालेगाव, मोहंमद आतिक मोहंमद बशीर (४२), रा. धुळे यांचा समावेश आहे. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात मारुती व्हॅनचालक प्रशांत सुरेश खैरनार याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट करीत आहेत. (वार्ताहर)