शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

दर्जेदार क्रीडांगणे होण्याची गरज : मेहता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:45 IST

फलटण : ‘दर्जेदार क्रीडांगणे, आवश्यक भौतिक सुविधा, उत्तम प्रशिक्षक आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ खेळाडूच राज्य व राष्ट्रीयस्तरावर पोहोचू ...

फलटण : ‘दर्जेदार क्रीडांगणे, आवश्यक भौतिक सुविधा, उत्तम प्रशिक्षक आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ खेळाडूच राज्य व राष्ट्रीयस्तरावर पोहोचू शकतात. या संकल्पनेला बगल देत आतापर्यंत उपलब्ध साधने, सुविधांमध्ये येथील खेळाडूंनी मोठी मजल मारली. वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आता दर्जेदार क्रीडांगणे, भौतिक सुविधा व उत्तम प्रशिक्षक आवश्यक आहे,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी व्यक्त केले.

क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी सातारा, तालुका क्रीडाधिकारी कार्यालय फलटण, मुधोजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय फलटण यांच्या संयुक्त सहभागाने घडसोली मैदान, फलटण येथे आयोजित मेजर ध्यानचंद यांची जयंती, राष्ट्रीय क्रीडा दिन आणि सुदृढ भारत अभियान अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक जगन्नाथ धुमाळ होते.

यावेळी मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बाबासाहेब गंगावणे, राष्ट्रीय खेळाडू दादासाहेब चोरमले, सुभाषराव भांबुरे, ज्येष्ठ राष्ट्रीय हॉकी खेळाडू शिरीष वेलणकर, महेंद्र जाधव, प्रवीण गाडे, पंकज पवार, सचिन लाळगे, सुनील वाघमारे, अक्रम मेटकरी उपस्थित होते.

माधुरी धुमाळ, माधुरी शेंडे, मानसी दोशी, वंदना माने, योगीता शहा, लीना खटावकर, परिमल रणवरे, अश्विनी चिरमे, सीमा जगदाळे, जयश्री शेंडे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.