शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांना हवंय नैसर्गिक घरकुल!

By admin | Updated: June 5, 2015 00:12 IST

विकतचे घरटे कशाला? : सहजीवनाच्या परंपरेला उजाळा देण्यासाठी थोडा बदल अपेक्षित--जागतिक पर्यावरण दिन

राजीव मुळ्ये - सातारा ‘आमच्या’ बाल्कनीत ‘आम्ही’ लावलेल्या घरट्यात एक छानसा पक्षी येऊन राहिला आहे. ‘आम्ही’ दिलेलं ‘फूड’ तो खातो. खूपच ‘कलरफुल’ आहे.... क्लिक! गॅलरी... कॅमेरा... सिलेक्ट... व्हॉट््स अ‍ॅप... ग्रुप! ‘वॉव’... ‘आॅसम’... ‘क्यूट’... अंगठा... छान... इत्यादी, वगैरे! हल्ली व्हॉट्स अ‍ॅपवर सर्रास दिसणारं हे चित्र. माणसानं ‘बांधलेल्या’ घरट्यात पक्षी येऊन राहतात. देईल ते खातात. मातीच्या बाउलमधलं पाणी पितात आणि व्हॉट्स अ‍ॅपवरून फिरता-फिरता ‘सेलिब्रिटी’ बनतात. हा पशुपक्ष्यांच्या हिताचा विचार आहे का? नक्कीच! यामागची भावनाही अत्यंत शुद्ध, स्वच्छ आहे. परंतु ती ज्या साच्यामध्ये घातली जात आहे, तो दूरगामी विचार करता घातक असल्याचं पक्ष्यांच्या अभ्यासकांना वाटतं. पक्ष्यांचे ‘नैसर्गिक’ अधिवास हिरावून घेतल्यानंतर आपण त्यांना ‘आपल्यासारखं’ जगायची सवय लावतो आहोत.मोबाइल येण्यापूर्वी अनेक नंबर आपल्याला तोंडपाठ असायचे. नंतर सगळे नंबर मोबाइलला ‘सेव्ह’ झाले आणि आज आपल्याला काहीच आठवत नाही. असंच काहीसं प्रत्येक प्राणिप्रजातीचं होत असतं. काही वर्षांनी पक्षी घरट बांधण्याची कलाच विसरले तर?शहरात एकेकाळी मोठ्या संख्येनं दिसणाऱ्या चिमण्या आणि इतर पक्षी पुन्हा येऊन आपल्या घराच्या आसपास बागडावेत, त्यासाठी आपण काहीतरी करावं, असं वाटण्यात गैर काहीच नाही. पण, त्यासाठीचा मार्ग ‘कृत्रिम’ नसावा, असं तज्ज्ञांचं मत आहे. मुळात पक्षी आपल्या घरापासून दूर का गेलेत, याचा अभ्यास करून त्या दृष्टीनं आपण स्वत: बदललं पाहिजे. मागच्या पिढ्यांनी जे नैसर्गिक शहाणपण दाखवलं, त्याचीच उजळणी करायची आहे. अंगण, वळचण, पॅरट होल, देवळी यापैकी कोणतीही गोष्ट आज शिल्लक नाही. वळचणीला आणि देवळीत घरटं बांधून पक्षी आरामात राहत होते. अंडी घालत होते. ‘पॅरट होल’ची संकल्पना तर केवळ अफलातून! एकाच वर्षात तीन वेगवेगळे पक्षी तिथं आपापल्या विणीच्या हंगामानुसार त्यात तळ ठोकून असायचे. अंगणात देशी झाडं होती. ती तर पक्ष्यांची लाडकी आश्रयस्थळं. हे सगळं लयाला जात असताना आपण ‘अपरिहार्य’ हा शब्द उच्चारून पाहत राहणार की थोडं स्वत:लाही बदलणार, हाच प्रश्न आहे. पक्षीप्रेमाचं व्यापारीकरणपक्ष्यांच्या प्रेमात पडणाऱ्यांना सध्या महागडी घरटी बाजारात तयार मिळतात. लाकडी असूनसुद्धा ती ‘इको फ्रेन्डली’ कशी काय, याचा उलगडा अनेकांना होत नाही. विविध धान्यांची संमिश्र भरड ‘पक्ष्यांचं खाद्य’ म्हणून विकत मिळते. त्यात काही वेळा ‘कद्रू’ म्हणजे गवताच्या बियाही मिसळल्या जातात. लाल मातीचे बाऊल पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी विकत मिळतात. असं सगळं ‘विकतचं’ पक्ष्यांना देऊन फोटो व्हॉट्स अ‍ॅपवर फिरवणं हा ‘स्टेटस सिंबल’ झालाय.हे व्हायला हवंएखाद्या सोसायटीच्या टेरेसवर सुतळ्या, काथ्या, काड्या, काटक्या, कापूस, चिंध्या, नारळाच्या शेंड्या अशा वस्तू जर पसरून ठेवल्या तर तो सोसायटीतला ‘कचरा’ ठरेल. परंतु जाणीवपूर्वक असं करणारे लोक आहेत. या वस्तू उचलून पक्षी आपले निवारे स्वत: बनवतात, हा त्यांचा अनुभव आहे. शहरात उरल्यासुरल्या पक्ष्यांना आपण ‘रेडिमेड’ घरटी दिली तर पक्षी घरटं कसं बांधतो, हे पुढच्या पिढीला कदाचित पाहायलाच मिळणार नाही. पक्षी हवे असतील तर...वड, पिंपळ, उंबर अशी स्थानिक झाडे जास्तीत जास्त लावाआवाजी फटाक्यांचा वापर कमीत कमी कराबांधकाम करताना देवळ्या, वळचणी, पॅरट हॉल बांधाडॉल्बीसारख्या कर्कश सिस्टिमचा वापर टाळा‘इव्हेन्ट’च्या वेळी रात्री आकाशात प्रकाशझोत टाकणे टाळा