शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या खेळीत निष्ठावंतांचा खुळखुळा

By admin | Updated: September 22, 2014 22:03 IST

जिल्हा परिषद : अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचे विधानसभेला उमटणार पडसाद

मोहन मस्कर-पाटील - सातारा -जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत अनेकांना धक्के मिळाले आणि अनअपेक्षितपणे दुसरेच चेहरे समोर आले. परिणामी राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले नाराज झाले. दोघांनीही आपली नाराजी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष प्रकटही केली. तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ‘मतांची बेरीज’ आणि ‘राजकीय तह’ या दोन गोष्टींना प्राधान्य देत मंत्री शशिकांत शिंदे आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपली पायाभरणी भक्कम केली आहे. ही पायाभरणी करताना निष्ठावंताचा खुळखुळा होत असल्याची भावनाही निर्माण झाली आहे. याकडेही राष्ट्रवादीच्या नेत्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत नेहमीच विधानसभेची गणिते दडलेली असतात आणि पदाधिकारी निवडीत विजयाची गणिते लपलेली असतात. ही बाब कोणीही नाकारत नाही आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा स्तरावरील नेत्यांनी त्याच सुत्राचा आधार घेत राजकीय खेळ्या केल्या. विशेष म्हणजे शिवाजीराव शिंदे आणि अमित कदम यांचे नाव अंतिम झाले असल्याची चर्चा रंगवून या दोघांना आणि माजी आ. सदाशिवराव पोळ आणि आ. शिवेंद्रसिंहराजेंना राष्ट्रवादीकडून गाफील ठेवण्यात आले. आ. बाळासाहेब पाटील आणि आ. प्रभाकर घार्गे यांच्या मागणीकडे राष्ट्रवादीने ढुंकूनही पाहिले नाही.माण-खटाव मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवूनच पहिले सूत्र ठरले. येथील जागा काँग्रेसला गेली असलीतरी राष्ट्रवादीचा बंडखोर विजयी होईल, याची शाश्वती आजही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाला नाही. फलटण विधानसभा मतदारसंघ दुसरे सूत्र होते. येथे रामराजेंसाठी सध्या ‘बिकट वाट’ आहे. परिणामी त्यांना बेरजेच्या राजकारणाशिवाय पर्यायच नव्हता. अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ते अगदी शनिवारपर्यंत रामराजेंचा शरद पवार अथवा अजित पवार यांच्यापैकी कोणाशीही संपर्क झाला नव्हता. मात्र, रामराजेंनी अगदी अंतिम क्षणी सर्वच ठिकाणची बेरजेची गणिते मांडली. यानंतर बारामतीकरांनी मंत्री शिंदे आणि रामराजेंशी चर्चा करून आपले मत माणिकराव सोनवलकरांच्या रुपाने धनगर समाजाच्या पारड्यात टाकले. तिसऱ्या सुत्राचा आधार लक्षात घेता उदयनराजेंचे दबावतंत्र शशिकांत शिंदे यांच्यासाठी ‘लकी’ ठरले. त्यांच्याच कोरेगाव मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या कोडोली गटाचे सदस्य रवी साळुंखे यांच्या गळ्यात अनपेक्षितपणे उपाध्यक्षपदाची माळ पडली. शिंदे यांच्यासाठी आता आणखी एक जमेची बाजू अशी की, सभापती निवडीत त्यांना आणखी एक पद मिळण्याची खात्री झाली.जिल्हा परिषद निवडणुकीत नेहमीच रामराजे आणि लक्ष्मणराव पाटील यांची भूमिका निर्णायक राहिली आहे. मात्र, यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे तात्या कुठेच दिसले नाहीत. त्यांच्या घरी काही बैठका झाल्या एवढेच. रामराजे मात्र सुरुवातीपासून सहभागी होते. फक्त मंत्री म्हणून शशिकांत शिंदे यांचा सहभाग वाढला आणि खा. उदयनराजेंनी पहिल्यांदाच जोरकसपणे दबावतंत्राचा वापर केला. मात्र, या निवडीचे चांगले-वाईट पडसाद कोरेगाव, फलटण, कोरेगाव आणि माण या चारही मतदारसंघात उमटणार आहेत.