शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल, खते दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पेट्रोल व डिझेल तसेच खत दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना वेठीस धरले गेले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पेट्रोल व डिझेल तसेच खत दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना वेठीस धरले गेले आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी साताऱ्यात दुचाकी ढकलून आंदोलन करण्यात आले.

भारतात पेट्रोल व डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दुसरा धक्का दिला आहे, त्यामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खताची दरवाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खताच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. १०-२६-२६ खताची किंमत ७०० रुपयांनी वाढले आहे. डीएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. डीएपी १ हजार १८५ रुपयांना मिळायचा, तोच आता एक हजार ९०० रुपयांना जाऊन पोहोचला आहे. १०-२६-२६ चे ५० किलोचे पोते ११७५ रुपयाची होते ते आता १७७५ रुपयांना मिळत आहे. या सोबतच पोटॅशियमचे किमती वाढल्या आहेत. देशातल्या खतांच्या किमती वाढवण्याचे काम सरकारने केले तरी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दरवाढीचा निषेध करीत आहोत, केंद्र सरकारने ताबडतोब खताची केलेली दरवाढ मागे घ्यावी व सर्वसामान्य शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या दरवाढीविरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस समिंद्रा जाधव, महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संगीता साळुंखे, युवती काँग्रेस प्रदेश सचिव स्मिता देशमुख, युवक प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलावडे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल शिंदे, शुभम साळुंखे, सेवादल प्रदेश संघटक राजेंद्र लावंघरे, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष शफिक शेख, पारिजात दळवी, औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय ढमाळ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आले.