शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

Coronavirus Unlock : लॉकडाऊननंतर बाहेर पडलेत निसर्ग साथी, केवळ माणूस बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:57 IST

नवनवीन शोध, तंत्रज्ञानामुळे माणसाची जीवन शैलीच बदलली. परंतु निसर्ग बदलला नाही. निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही हे कोरोना, निसर्ग चक्रीवादळाने दाखवून दिले. कोरोनानंतर माणसाने स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले. याच निसर्गातील अनेक जीवजंतू ऋतूमानानुसार काही कालावधीसाठी लॉकडाऊन होत असतात. बामणोली परिसरातील खेकडे, जळू यांचा लॉकडाऊन संपला आहे.

ठळक मुद्दे लॉकडाऊननंतर बाहेर पडलेत निसर्ग साथी, केवळ माणूस बदललाअन्नसाखळीतील खेकडे, बेडूक अन् जळू दिवाळीपासून होते नैसर्गिक अधिवासात

लक्ष्मण गोरेबामणोली : नवनवीन शोध, तंत्रज्ञानामुळे माणसाची जीवन शैलीच बदलली. परंतु निसर्ग बदलला नाही. निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही हे कोरोना, निसर्ग चक्रीवादळाने दाखवून दिले. कोरोनानंतर माणसाने स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले. याच निसर्गातील अनेक जीवजंतू ऋतूमानानुसार काही कालावधीसाठी लॉकडाऊन होत असतात. बामणोली परिसरातील खेकडे, जळू यांचा लॉकडाऊन संपला आहे.खेकडे व जळू हे पावसाळा संपल्यावर पूर्णपणे गायब होत असतात. मग हे प्राणी कोठे राहतात, असा प्रश्न पडतो. खेकडे उन्हाळा सुरू होण्यापूर्वी ओढे, ओहोळेतील दगडाखाली दूरवर जमिनीत खोल बीळ करून राहतात. मान्सून सुरू होताच ते पुन्हा बाहेर येतात.खेकड्यांमध्ये तांबडे खेकडे व काळे खेकडे असे दोन प्रकार असतात. तांबडे खेकडे हे उंचीवरील प्रदेशात म्हणजेच जांभा दगड असणारे महाबळेश्वर, कास पठार, ठोसेघर परिसरात आढळतात. काळे खेकडे सपाट सखल प्रदेशात म्हणजेच काळा दगड असणाऱ्या तापोळा, बामणोली, सातारा, परळी, कऱ्हाड अशा ओढे नदीकाठी आढळतात.

या खेकड्यांच्या मादी या पावसाळा सुरू होताच कवचातील पिल्ले पाण्यात वाढीसाठी सोडतात. त्यांनी या पिल्लांची निर्मिती उन्हाळ्यात करून ठेवलेली असते. खेकड्यांसोबत प्रकट होणारा जळू कीटक आहे. जळू माणूस व जंगली प्राणी, जनावरांचे रक्त पितो. माणसांच्या पायाला चावून अशुद्ध रक्त पितो. त्यामुळे अनेक पाश्चात्य वैद्यकीय उपचारांमध्ये जळू पकडून त्याद्वारे मेडिकल थेरपी केली जाते. रक्त पिलेल्या कित्येक पट रक्तस्त्राव त्या ठिकाणाहून होतो.जळू ही दलदल असणाऱ्या ठिकाणी पालापाचोळा कुजलेल्या ठिकाणी आढळते. उन्हाळ्यात ती मृत अवस्थेत आढळते. वणवा गेला तरी जमिनीवरील गवत मात्र जळते; परंतु जळूला काहीही इजा होत नाही. पाऊस पडताच जळू लगेच जिवंत होते. भांबवली कासचा दलदलीचा परिसर, महाबळेश्वर, वासोटा, ठोसेघर या परिसरात जळू मोठ्या प्रमाणात आढळतात.काही मानवी वस्त्याही अलिप्तप्राण्यांप्रमाणेच काही गावे व मानवी वस्त्या आजही अलिप्त राहतात. जावळी तालुक्याच्या पश्चिमेकडील तळदेव मायणी व देऊर ही ठोसेघर पठाराला लागून असलेली दोन गावे तसेच मालदेव व रवदी मुरा येथील एका कुटुंबांची वस्ती वीज, रस्ता मोबाईल यांची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. निव्वळ पाणवठ्याची सोय असल्याने ही गावे अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्य करत आहेत.

टॅग्स :environmentपर्यावरणSatara areaसातारा परिसरwildlifeवन्यजीवCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक