शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मसूरकरांना ऐकू येणार ‘गुडमॉर्निंग’ची हाक!

By admin | Updated: October 6, 2015 00:42 IST

ग्रामसभेत इशारा : निर्मलग्रामसाठी प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधण्याचे आवाहन

मसूर : स्वच्छ व निर्मल भारत बनविण्यासाठी प्रथम गावापासून सुरूवात होण्याची गरज आहे. हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी प्रत्येकाने शौचालय बांधण्याची गरज आहे. त्यासाठी शासन अनुदान देते. मसूरमधील शौचालय नसलेल्या सर्व कुटुंबांनी स्वत:चे शौचालय बांधणीसाठी पुढाकार घ्यावा व मसूर निर्मलग्राम करावे, असे आवाहन करून यापुढे उघड्यावर शौचविधी करणाऱ्यांवर गुडमॉर्निंग पथकाव्दारे कारवाई करण्याचा इशारा मसूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत देण्यात आला. मसूर ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या ग्रामसभेत निर्मलग्रामचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच रेखा वायदंडे होत्या. यावेळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, केंद्रप्रमुख शकुंतला साळुंखे, मुख्याध्यापक दिलीप सावंत, अ‍ॅड. रणजितसिंह जगदाळे, ग्रामविकास अधिकारी आर. टी. पवार, ग्रामपंचायत सदस्य सुनील दळवी, संजय शिरतोडे, प्रकाश जाधव, दीपक जगदाळे, फैजल मोमीन, सतीश कदम, वनिता बर्गे, सुनिता मसूरकर, वहिदा मुल्ला, मनीषा जगदाळे, आशा कदम, कृषी सहायक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. लोखंडे यांनी साथीचे आजार व उपचार याविषयी माहिती दिली. कृषी सहायक अनिता कदम यांनी फळबाग लागवड योजना तसेच उपलब्ध मका बियाण्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मसूर येथील खासगी दवाखान्यातील डॉक्टर रात्री-अपरात्री रूग्णांना सेवा देत नाहीत, त्यांना समज द्यावी, असे सतीश पाटील यांनी सांगितले. बांधकाम खात्याने गटारे काढावीत. पाणीप्रश्न, उद्यानाचा वापर, अंगणवाडीसाठी जागा द्यावी विषयावर चर्चा झाली.यावेळी शासकीय परिपत्रके वाचून दाखवून विविध शासकीय लाभार्थींची निवड करण्यात आली. फैजल मोमीन यांनी आभार मानले. (वार्ताहर) शनिवारचा बाजार सुरू करावा...संभाजी जगदाळे व सतीश पाटील यांनी बाजारपेठेतील शनिवारचा बाजार कोणी व का बंद केला असा प्रश्न उपस्थित करून तो प्रत्येक शनिवारी भरवण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच जो कोणी शनिवारी येणार नाही त्या व्यापाऱ्याला बुधवारी बाजारात बसू देऊ नये. यासह कचऱ्याची इतरत्र विल्हेवाट लावावी, असे आवाहन केले.