शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणातील सूत्रधाराचे पलायन

By admin | Updated: July 19, 2015 00:40 IST

वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना प्रकार

सातारा : आरळे (ता. सातारा) येथील बजरंग जगन्नाथ गायकवाड (वय ३१) याचा खून केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या अक्षय लालासो पवार (२०, रा. खंडोबाचा माळ, सातारा) या संशयित मुख्य सूत्रधाराने शनिवारी दुपारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून, आरोपी अक्षय पवारचा पोलीस कसून शोध घेत आहेत. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून बजरंग गायकवाड याचे दि. २६ मार्चला गावातून अपहरण करण्यात आले होते. त्याचा तपास करताना भयानक क्रौर्य समोर आले होते. बजरंगला अंभेरी घाटात नेऊन दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर साताऱ्यात आणून एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले होते. तेथेच त्याचा मृत्यू झाला होता. हे लक्षात येताच आरोपींनी मृतदेह अंभेरी घाटात नेऊन जाळला होता. याप्रकरणी पोलिसांनी वासुदेव शिवाजी जांभळे (२२, रा. रहिमतपूर), आकाश शरद सोनटक्के (२८, रा. बारावकरनगर, सातारा), राजेंद्र ऊर्फ वैभव रामराव पवार (४५, रा. खेड, ता. सातारा) यांना अटक केली होती. मात्र, या घटनेपासून मुख्य सूत्रधार अक्षय पवार हा फरार होता. शनिवारी तो कोरेगाव तालुक्यातील डोळेगाव येथील एका पोल्ट्री फार्मवर आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलीस तेथे तत्काळ पोहोचले. त्याला ताब्यात घेऊन साताऱ्यात आणले. दुपारी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीचे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यात येत होते. याचवेळी अक्षयने पोलिसांच्या हाताला हिसका देऊन रुग्णालयातून धूम ठोकली. त्याच्या पाठोपाठ पोलीस धावत सुटले; मात्र तो सापडला नाही. खून प्रकरणातील आरोपी रुग्णालयातून पळाल्याचे समजताच जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीच्या शोधासाठी दोन पथके तयार करून विविध ठिकाणी रवाना केली. रात्री उशिरापर्यंत अक्षयचा पोलीस शोध घेत होते. (प्रतिनिधी)