Vidip Jadhav: कोणतीही अडचण आल्यास नि:संकोच सांगा, जाधव कुटुंबाचे सांत्वन करताना नीलेश लंके यांनी केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:42 IST2026-02-04T16:41:39+5:302026-02-04T16:42:31+5:30

तरडगाव : बारामती येथील विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाल्याच्या घटनेने सर्वांना मोठा धक्का बसला ...

MP Nilesh Lankey consoled the family of Videep Jadhav who died in the plane crash in Baramati | Vidip Jadhav: कोणतीही अडचण आल्यास नि:संकोच सांगा, जाधव कुटुंबाचे सांत्वन करताना नीलेश लंके यांनी केले आवाहन

Vidip Jadhav: कोणतीही अडचण आल्यास नि:संकोच सांगा, जाधव कुटुंबाचे सांत्वन करताना नीलेश लंके यांनी केले आवाहन

तरडगाव : बारामती येथील विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाल्याच्या घटनेने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. यामध्ये विदीपच्या रूपाने आपण एकुलता एक मुलगा गमावला आहे. पवार कुटुंबीयांनी सांत्वन करीत आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे. भविष्यात शिक्षणाबाबत अथवा वैयक्तिक कोणतीही अडचण आल्यास नि:संकोच मला सांगा,’ असे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबाचे सांत्वन करताना सांगितले.

फलटण तालुक्यातील तरडगाव येथील जाधव कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आलेल्या खासदार नीलेश लंके यांनी घरातील व्यक्तींशी चर्चा करीत प्रत्येकाची मोठ्या आपुलकीने विचारपूस केली. यावेळी वडील दिलीप जाधव, सुरेंद्रकुमार घाडगे, आई विद्या जाधव, पत्नी संध्या व घरातील इतर नातेवाईक उपस्थित होते.

विदीप अन् माझी चांगली ओळख होती. त्याचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता. अजित पवारांचे सर्व सुरक्षा रक्षक, कर्मचारी हे सगळेच माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायचे. यामुळे या सर्वांशी माझे वैयक्तिक चांगले संबंध निर्माण झाले. विदीपच्या जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाल्याचे सांगत खासदार नीलेश लंके यांनी त्यास श्रद्धांजली वाहिली. भविष्यात कोणतीही अडचण आल्यास आवर्जून माझ्याशी संपर्क करा, असे त्यांनी सांगितले.

Web Title : नीलेश लंके ने जाधव परिवार को सांत्वना दी, त्रासदी के बाद अटूट समर्थन का प्रस्ताव रखा।

Web Summary : सांसद नीलेश लंके ने जाधव परिवार को सांत्वना दी, जिन्होंने बारामती विमान दुर्घटना में अपना बेटा विदीप खो दिया। उन्होंने उन्हें समर्थन का आश्वासन दिया, खासकर शिक्षा के संबंध में, और भविष्य में बिना किसी हिचकिचाहट के संपर्क करने का आग्रह किया। लंके ने विदीप को याद करते हुए शोक व्यक्त किया।

Web Title : Nilesh Lanke consoles Jadhav family, offers unwavering support after tragedy.

Web Summary : MP Nilesh Lanke consoled the Jadhav family, who lost their son Vidip in the Baramati plane crash. He assured them of support, especially regarding education, urging them to reach out without hesitation in the future. Lanke remembered Vidip fondly, offering condolences.