अर्भक मृत्यू प्रकरणात 'सिव्हिल'च्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 14:14 IST2026-04-17T14:14:08+5:302026-04-17T14:14:08+5:30

बाळावर आवश्यक उपचार केले नसल्याचे आरोप

Mobile money at the risk of life! Friend killed friend by crushing him with a stone under the bridge on Kolhapur-Sangli highway | अर्भक मृत्यू प्रकरणात 'सिव्हिल'च्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

अर्भक मृत्यू प्रकरणात 'सिव्हिल'च्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

सातारा : अर्भक मृत्यू प्रकरणात जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. चांदसाहेब शिकलगार यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, जिल्हा शासकीय रुग्णालयात १६ मार्च २०२६ रोजी एका १६ वर्षांच्या मुलीला गर्भपात करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी गर्भपात प्रक्रियेदरम्यान जिवंत बाळाचा जन्म झाला. बाळावर आवश्यक ते उपचार करणे गरजेचे होते. सिव्हिल हॉस्पिटल सातारमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चांदसाहेब शिकलगार (रा. सातारा) यांनी बाळास योग्य उपचार न पुरवले नाहीत. दरम्यान, अर्भक मृत्यू प्रकरण पुढे आल्यानंतर डॉ. चांदसाहेब शिकलगार यांना प्रशासनाने तातडीने निलंबित केले आहे.

काय आहे प्रकरण

विजयपूर (कर्नाटक) येथील अल्पवयीन मुलगी गर्भवती होती. तिची प्रसूती जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आली. मात्र, यादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी नातेवाइकांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये महिला व बालविकास विभागामार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे.

Web Title : सतारा: शिशु मृत्यु मामले में डॉक्टर पर गैर इरादतन हत्या का आरोप

Web Summary : सतारा सिविल अस्पताल में नवजात शिशु की कथित लापरवाही से मौत के बाद डॉ. शिकलगार पर गैर इरादतन हत्या का आरोप लगा है। जांच में नाबालिग के गर्भपात के दौरान पैदा हुए समय से पहले शिशु की अपर्याप्त देखभाल का पता चला। शिशु की मृत्यु और बाद की जांच के बाद डॉक्टर को निलंबित कर दिया गया।

Web Title : Satara: Doctor Charged with Culpable Homicide in Infant Death

Web Summary : Dr. Shikalgara faces culpable homicide charges after a newborn died due to alleged negligence at Satara Civil Hospital. A probe revealed inadequate care for a premature infant born during a minor's abortion. The doctor was suspended following the infant's death and subsequent investigation.