शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पाच मतदारसंघात मनसेचे उमेदवार जाहीर

By admin | Updated: September 25, 2014 23:30 IST

विधानसभा : सातारा, वाई, फलटणला उमेदवारच नाही

सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील २८८ पैकी १५३ मतदारसंघांतील उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर केली असून, यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, फलटण, वाई आणि सातारा येथून मनसेला अजूनही उमेदवार निश्चित करता आलेला नाही. मनसेचे जिल्ह्यातील उमेदवार आजच अर्ज भरण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेनेही त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, मनसेच्या यादीत यापैकी फक्त पाचच मतदारसंघांची नावे आहेत. माण-खटावमधून जिल्हाप्रमुख धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोरेगावातून युवराज पवार, कऱ्हाड उत्तरमधून राजू केंजळे, कऱ्हाड दक्षिणमधून विकास पवार आणि पाटणमधून रवींद्र शेलार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.दरम्यान, गेल्या निवडणुकीत मनसेने फक्त पाटण मतदारसंघातूनच उमेदवार दिला होता. मात्र, त्यांच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी मात्र, मनसेने जिल्ह्यातील आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघांत आपले उमेदवार दिले आहेत.फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव असून, येथे मनसेला उमेदवार मिळालेला नाही. साताऱ्यातून कोण उमेदवार यावरही अजून चर्चा झालेली नाही. मात्र, दोनच दिवसांत वाई मतदारसंघातील उमेदवार दोन जाहीर होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)मनसेचे मूळ साताऱ्यातच...दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपूर्वी राज ठाकरे यांनी साताऱ्यातील काही प्रमुख मान्यवरांशी चर्चा केली होती. मात्र, गेल्या निवडणुकीत त्यांनी सातारा जिल्ह्यातून फक्त एकच उमेदवार दिला होता. आजही राज ठाकरे सातारा दौऱ्यावर आले तर या मान्यवरांची चर्चा करतातच आणि पुढे काय करता येईल याचा ही आढावा घेतात.