Satara Crime: पन्नासहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून घेतला ट्रॅक्टर चोरट्याचा माग, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:08 IST2025-10-01T17:08:04+5:302025-10-01T17:08:22+5:30
म्हसवड पोलिसांची कामगिरी, चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासांत उघडकीस

Satara Crime: पन्नासहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून घेतला ट्रॅक्टर चोरट्याचा माग, तिघांना अटक
म्हसवड : रहिमतपूर येथून चोरीस गेलेला ट्रॅक्टरचा छडा अवघ्या चोवीस तासांत लावण्यात म्हसवड पोलिसांना यश आले. यासाठी पन्नासपेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले असून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १९ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल म्हसवड पोलिसांनी हस्तगत केला आहे.
गौरव भागवत पवार, शिवराज नानासो पंडित, संदीप बाळकृष्ण कदम (सर्व रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव), गौरव भागवत पवार, शिवराज नानासो. पंडित, संदीप बाळकृष्ण कदम (सर्व रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार नामे गणेश शंकर ढाणे (रा. पाडळी, ता. सातारा) यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार त्यांचा हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर (एमएच- ११, डीएन- ९०४२) हा ट्रॅक्टर टँकरसहित चोरीस गेला. याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची सूत्रे हातात घेऊन गुन्हे प्रकटीकरण कर्मचाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना म्हसवड पोलिस ठाणे हद्दीतील काही कॅमेऱ्यामध्ये संशयित आरोपी हा ट्रॅक्टर घेऊन जाताना दिसले.
या आरोपींनी ट्रॅक्टरसोबत टँकर असल्यामुळे जोरात गाडी चालवता येत नसल्याने टँकर रस्त्यामध्येच सोडून फक्त ट्रॅक्टर घेऊन पुन्हा पळून गेले. त्यांचा शोध घेत असताना म्हसवड ते रहिमतपूर असा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पाठपुरावा करून त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषण करून हा ट्रॅक्टर रहिमतपूर हद्दीतील चोरून घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले.
यामध्ये गौरव भागवत पवार, शिवराज नानासो. पंडित, संदीप बाळकृष्ण कदम (सर्व रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) यांना तत्काळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल त्याचबरोबर गुन्हा करताना त्यांनी वापरलेली व्हॅन व इतर साहित्य जप्त केले आहे.
जा गुन्हा अवघ्या चोवीस तासांत उघडकीस आणून गुन्ह्यातील १९ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या टीमला यश आले आहे. चोरीच्या गुन्ह्याचा जलद तपास लावल्याबद्दल तक्रारदार आणि पोलिस ठाणे हद्दीतील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, नीता पळे, राजेंद्र कुंभार, राहुल थोरात, युवराज खाडे, विकास ओंबासे यांनी केली आहे.