वडूजला हुतात्मा अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST2021-09-08T04:47:00+5:302021-09-08T04:47:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवार, दि. ९ रोजी हुतात्मा स्मारक वडूज येथे हुतात्मा अभिवादन ...

Martyr greetings to Vaduz | वडूजला हुतात्मा अभिवादन

वडूजला हुतात्मा अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवार, दि. ९ रोजी हुतात्मा स्मारक वडूज येथे हुतात्मा अभिवादन व स्वातंत्र्य सैनिक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजन समितीचे स्वागताध्यक्ष तथा पक्षाचे प्रदेश सचिव रणजितसिंह देशमुख यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना रणजितसिंह देशमुख म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीत साताऱ्याच्या ‘प्रती सरकार’ चळवळीला ऐतिहासिक महत्त्व आहे. या आंदोलनात वडूज या ठिकाणी ९ सप्टेंबर १९४२ साली हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली वडूज कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी इंग्रज अधिकाऱ्याने केलेल्या बेछूट गोळीबारात नऊ हुतात्म्यांनी बलिदान दिले होते. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी पक्षाच्या वतीने हुतात्मा अभिवादन व स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान कार्यक्रम होणार आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम, पक्षाच्या सहप्रभारी सोनल पटेल, कार्याध्यक्ष बसवराज पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे हे विशेष अतिथी असणार आहेत. पक्षाचे अखिल भारतीय सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस विनायक देशमुख, अभय छाजेड, सरचिटणीस गुलाबराव घोरपडे आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. (वा.प्र)

फोटो : रणजितसिंह देशमुख

Web Title: Martyr greetings to Vaduz