शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मराठी विश्वकोश कार्यालय वाईतच : करंबेळकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 14:50 IST

वाई येथील मराठी विश्वकोशाचे कार्यालय पुणे अथवा मुंबईला हलविण्याच्या चर्चा वाई शहरात चालू असून, यामध्ये कोणतेही तथ्य नाही.

वाई : ‘वाई येथील मराठी विश्वकोशाचे कार्यालय पुणे अथवा मुंबईला हलविण्याच्या चर्चा वाई शहरात चालू असून, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. शासन दरबारी याबाबतचा कोणताही निर्णय झाला नसून मराठी विश्वकोश कार्यालय वाईमध्येच राहणार आहे, तरी वाईकर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,’ अशी माहिती मराठी विश्वकोश कार्यालयाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी दिली. मराठी विश्वकोशाचे कार्यालय वाईमधून हलविण्याची चर्चा मराठी भाषा विभागाच्या अधिका-यांमध्ये असल्याची माहिती मिळाल्याने वाईकरांनी चिंता व्यक्त केली होती. या निर्णयाचे वाईत तीव्र पडसाद उमटले असून, नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. दरम्यान, वाईतील कार्यालय कुठेही हलविण्याचा प्रस्ताव नसल्याचे विश्वकोशाच्या सहायक सचिवांनी सांगितले. मराठी भाषा प्रगल्भतेसाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संकल्पनेतून आणि माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून वाई येथे विश्वकोश खंडाचे काम १९६०मध्ये सुरू झाले. जागतिक विश्वकोशाच्या धर्तीवर मराठी भाषेत माहितीचा खजिना विश्वकोशाच्या माध्यमातून उभारण्याचा संकल्प आजही सुरू आहे. पूर्वी मुद्रित खंडाच्या माध्यमातून उपलब्ध असणारा विश्वकोश आता एका क्लिकवर गुगल व विश्वकोशाच्या अ‍ॅपवर उपलब्ध आहे.विश्वकोशाचे काम गेली अनेक वर्षे वाईतून सुरू आहे. प्राज्ञपाठ शाळा मंडळाच्या प्रशस्त इमारतीत हे काम सुरू आहे. विश्वकोश कामकाज पाहण्यासाठी, अभ्यासण्यासाठी, विश्वकोशाच्या अद्ययावत ग्रंथालयाचा अनुभव घेण्यासाठी तसेच विश्वकोशाच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी अनेक अभ्यागत व विद्वान वाईला येत असतात. सध्याचे असणारे येथील कार्यालय पुणे अथवा मुंबई येथे हलविण्याचा मराठी भाषा विभागात सचिवस्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे. याची चर्चा सुरुवातीला समाज माध्यमातून सुरू झाली. यावर वाई येथील भगवा कट्टा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे वाईकरांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. या अनुषंगाने वाईत तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे. यानिर्णयाबाबत आंदोलन करण्यासाठी नागरिक, युवकांनी त्यांच्या स्तरावर आंदोलन उभारण्यासाठी बैठका सुरू केल्या आहेत. तसेच वाईकर नागरिकांच्यावतीने तशा आशयाचे लेखी निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे.