शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कलगीतुऱ्यात अडकले अनेकांचे भविष्य!

By admin | Updated: September 14, 2014 00:00 IST

सभापतिपदासाठी अनेकांचे बाशिंग : कऱ्हाड, खंडाळ्याचा तिढा कसा सुटणार ?

प्रमोद सुकरे, कऱ्हाड : राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना साताऱ्यात मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडीत ‘बिघाडी’च पाहायला मिळत आहे़ आता अडीच वर्षांचा पहिला अंक संपल्यानंतर रविवारी दुसरा अंक सुरू होतोय़ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही ‘राग’ आघाडीधर्म आळविला जाईल, असे वाटत आहे; पण गत दोन दिवसांत दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या कलगीतुऱ्यामुळे अनेक इच्छुकांचे भविष्य टांगणीला लागले आहे़काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात आघाडी आहे़ त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतही तशीच आघाडी राहील, अशी आशा काँग्रेसजनांना वाटत होती़ जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे संख्याबळ पुरेसे असतानाही काँग्रेसला एखादे सभापतिपद देऊन सत्तेत सहभागी करून घेतील, अशी अटकळही बांधली जात होती; पण कदाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्याच जिल्ह्यात मोठेपणा द्यायचा नाही, या हेतूने तसं घडलं नसावं़ जिल्हा परिषदेचा विषय दूरच; पण मुख्यमंत्र्यांच्या कऱ्हाडात नगरपरिषदही काँग्रेसकडे राहणार नाही, याची दक्षता बारामतीच्या दादांनी प्रामाणिकपणे घेतली़ त्याहीपुढे जात कऱ्हाड पंचायत समितीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त असताना राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचा करिष्मा स्थानिक नेत्यांनी केला़ खंडाळ्यात तर राष्ट्रवादीने चक्क सेनेशी हातमिळवणी करत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यातच धन्यता मानली़ या सर्व प्रकारामुळे राज्यात आघाडी सरकार असले तरी, जिल्ह्यात मात्र बिघाडीचेच वातावरण असल्याचे दिसते. नव्याने होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील निवडीत भूतकाळातील घडामोडींना पूर्णविराम देऊन नवा अध्याय सुरू होईल काय? अशी चर्चा दोन्ही काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात सुरू होती़ मात्र, गेले दोन दिवस दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे़ रविवारी होणाऱ्या पंचायत समितीच्या निवडीसंदर्भात गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेकांचे भविष्य टांगणीला लागले आहे, हे मात्र नक्की!