शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

अनेक धरणग्रस्त गावे पाण्यापासून वंचित

By admin | Updated: November 7, 2014 00:10 IST

वांग-मराठवाडीतील स्थिती : शासकीय खर्चाने पाणी उचलून देण्याची गरज

सणबूर : वांग-मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या ४६ गावांपैकी काही गावे अशी आहेत की शासनाने त्यांना शासकीय खर्चाने पाणी उचलून दिले नाही तर ती गावे पाण्यापासून कायमच वंचित राहणार आहेत़ जानुगडेवाडी, शितपवाडी, मंंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, धामणी, कुंभारगाव अशा गावांना पाण्याचा लाभ होणार नाही़ परंतु अशा गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी स्लॅबमुळे धरणग्रस्तांनी काढून घेतलेल्या आहेत़ शासनाने अशा गावातील शेतकऱ्यांना शासकीय खर्चाने उपसासिंचनाद्वारे पाणी देण्याची गरज आहे़ यासाठी वांगच्या धरणग्रस्तांनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी त्यांनी लढा कायम ठेवला असला तरी त्यांना अद्याप यश आलेले नाही़ यामधील वस्तुस्थिती पाहिली तर घोटील हे गाव ९०•टक्के स्थलांतरित झाले आहे़धरणाच्या बाजूला असलेल्या जाधववाडी व मराठवाडी गावांची अंशत: जमीन धरणाच्या पाण्यामध्ये गेली असल्यामुळे; परंतु त्यांचे घर किंवा गावठाण प्रत्यक्षात बाधित न झाल्यामुळे धरणग्रस्तांचे पुनर्वसन गावठाणामध्ये शासनाने शेड बांधून केले आहे़ ज्या ठिकाणी जाधववाडी व मराठवाडी पुनर्वसन झाले आहे़ त्याठिकाणी ते अद्याप स्थलांतरित झालेले नाहीत़ त्यांना त्या ठिकाणी प्लॉट व जमिनी दिल्या आहेत़ ते त्या ठिकाणी येऊन-जाऊन शेती करत आहेत़ तसेच मेंढ येथील सहा कुटुंबे प्रथम घळभरणीमध्ये प्रत्यक्ष बाधित झाल्याने ती कुटुंबे घारेवाडी (ता़ कऱ्हाड) येथील गावठाणात स्थलांतरित झाली आहेत़सध्या वांग-मराठवाडी धरणातील संपूर्ण पाणी नदीपात्रामधून वाहून जात असल्यामुळे पुढील काळात शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी या लाभक्षेत्रातील गावामध्ये पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण होणार आहे़ त्यामुळे वाहून जात असलेले पाणी साठवून ठेवले तर पाणी टंचाईवर मात करता येईल, यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे़ यासाठी शासकीय खर्चाने उपसासिंचनाद्वारे पाणी देण्याची गरज आहे़ (वार्ताहर)उठाव करण्याची गरजवांग-मराठवाडी धरणग्रस्तांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या बैठकीत ज्या ठिकाणी धरणग्रस्तांना जमिनी मिळाल्या आहेत, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीला पाणी कसे देता येईल़ याबाबतचे प्रस्तावही शासनाला दिले गेलेले दिसत नाहीत़ परंतु शासनाने कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचललेली दिसत नाहीत़ परंतु लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही यासाठी उठाव करण्याची गरज आहे़