शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘मनो’,‘धैर्य’च ठरतंय प्रस्थापितांची डोकेदुखी!

By admin | Updated: September 22, 2014 22:03 IST

कऱ्हाड उत्तर : अनेकांचे देव पाण्यात; पण कोण-कोण उतरणात रिंगणात ?

प्रमोद सुकरे - कऱ्हाड  -आघाडी, महायुतीतील घोळ संपता संपेना; पण उत्तरेत स्वाभिमानीचे मनोज घोरपडे व काँग्रेसच्या धैर्यशील कदमांच्या प्रचार रणधुमाळीने राष्ट्रवादीच्या प्रस्थापितांची मात्र डोकेदुखी वाढत आहे़कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीवेळी पुनर्रचना झाली़ कऱ्हाड शहरासह १४ गावे उत्तरेतून दक्षिणेत आली़, तर सातारा तालुक्यातील दोन व खटाव तालुक्यातील एक जिल्हा परिषद गट उत्तरेला नव्याने जोडण्यात आले़ नव्या मतदारसंघाचा आवाका नव्या उमेदवाराला आला नाही़ परिणामी, बंडखोर उमेदवार येथे विजयी झाला़ गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आमदार आनंदराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशील कदमांनी काँग्रेसचे हात बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे़ त्यांनी संवाद यात्रेच्या माध्यमातून गावागावात जाऊन संपर्क साधला़ त्याला मिळालेला प्रतिसाद प्रस्थापितांना नक्कीच विचार करायला लावणारा आहे़ त्यातच गेल्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब पाटलांच्या कोअर कमिटीत असणाऱ्या मनोज घोरपडेंचा ‘स्वाभिमान’ जागा झालेला दिसतोय़ शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ते प्रचाराला लागलेत़ घोरपडेंच्च्या मातोश्री जिल्हा परिषद सदस्या आहेत. सातारा तालुक्यातील उमेदवार असल्याने गेल्या निवडणुकीत प्रस्थापितांना येथून मिळालेले मतदान यंदा किती मिळणार, हाही महत्त्वाचा भाग आहे़ आघाडी-महायुतीत जागावाटपाचा घोळ सुरूच आह़े़ उत्तर मतदारसंघ राष्ट्रवादीला गेला तरी धैर्यशील एक ‘कदम’ मागे घेतील, असे वाटत नाही़ महायुतीत हा मतदारसंघ कोणाकडेही गेला तरी घोरपडे अपक्ष लढणार असल्याचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले आहेत़ त्यामुळे विद्यमान आमदारांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढतेय, हे नक्की!‘मनस’चे केंजळेही तयारीत..महायुतीतला जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने सेना भाजपच्या इच्छुकांनीही गुडघ्याला बाशिंग बांधले आहे़ भाजपचे इच्छुक उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचुपते यांचे जावई धैर्यशिल पाटील-शिरगावकर उमेदवारी अर्जही घेवून गेलेत़ सेनेचे समिर जाधव इच्छुक आहेतच तर मनसेच्या राजेंद्र केंजळे यांनी नागठाणेत नुकताच जोरदार मेळावा घेवून उमेदवारीचे संकेत दिले आहेत़ त्यामुळे उत्तरचं ‘उत्तर’ कोणकोण शाधणार ? याचा शोध घेणे अवघड बनले आहे़