शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात बैठकीकडे मंडईतील विक्रेत्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:55 IST

येथील पालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावाने प्रशस्त भाजी मंडई १५ फेब्रुवारीला सुरू केली आहे. शेतकरी-व्यापारी या ...

येथील पालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावाने प्रशस्त भाजी मंडई १५ फेब्रुवारीला सुरू केली आहे. शेतकरी-व्यापारी या मंडईत बसत होते. ग्राहकही तेथे जाऊन मालाची खरेदी करत होते. मात्र, मंगळवारी काही व्यापारी व शेतकऱ्यांनी मलकापूर फाटा ते मंडई हे अंतर जास्त असल्याने तेथे ये-जा करण्यास त्रास होत आहे. रिक्षा भाड्यापोटी जास्त पैसे द्यावे लागत आहेत. ग्राहक तिथे येण्यात कुचराई करत आहेत आदी कारणे सांगत कोयना वसाहत येथील गणपती मंदिरालगतच्या पालिकेच्या हद्दीतील रस्त्यावर मंडई भरवली. ही माहिती पालिका प्रशासनाला मिळाली. पालिका कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे साहित्य ट्रॅक्टरमध्ये भरण्यास सुरुवात केल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यावेळी कर्मचारी व शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. मुख्याधिकारी मर्ढेकर यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन गुरुवारी बैठक बोलवली. मात्र, या बैठकीकडे कोणीच फिरकले नाही.

- चौकट

जुन्या ठिकाणीच बसण्याचा हट्ट

आम्ही कोयना वसाहत ग्रामपंचायतीच्या हद्दीत बसत आहे. आम्हाला उठविण्याचा पालिकेचा संबंध नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, तर ज्या रस्त्यावर मंडई भरते तो रस्ता पालिकेच्या हद्दीतील असून, पालिकेने तयार केलेला आहे. काही शेतकरी कोयना वसाहतीच्या हद्दीत बसत आहेत. मात्र तेथील ग्रामसेवकांनीही परवानगी दिलेली नाही, असे मुख्याधिकारी मर्ढेकर यांचे म्हणणे आहे.