शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

काळचौंडीत बिनविरोध महिलाराज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:52 IST

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील काळचौंडी गावच्या सरपंचपदी राणी भाऊ माने, तर उपसरपंचपदी अर्चना आबा कोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड ...

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील काळचौंडी गावच्या सरपंचपदी राणी भाऊ माने, तर उपसरपंचपदी अर्चना आबा कोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विमल हांडे, लक्ष्मी सावंत, ऊर्मिला कुंभार, अर्चना जाधव, सारिका केंगार, सुवर्णा तिवाटणे, विजया माने, सर्व महिला ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होत्या.

माण तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कुकुडवाड गटातील काळचौंडी गावच्या ग्रामपंचायतीवर सर्व महिला सदस्यांचेच राज्य प्रस्थापित झाले आहे. पक्ष, पार्टी, गट, तट बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी कसलेही हेवेदेवे न बाळगता काळचौंडीच्या ग्रामस्थांनी मोठ्या मनाने महिलांच्या हाती गावचा कारभार सोपवला आहे. काळचौंडी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या सरपंच निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.बी. शिंदे व ग्रामसेवक मल्हारी खाडे यांनी काम पाहिले. यावेळी दोन्ही गटांचे प्रमुख माजी सरपंच बाळासाहेब माने व बाळासाहेब माने, पोलीस पाटील संध्याराणी माने, पोलीस काॅन्स्टेबल नंदकुमार खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. निवडीनंतर सरपंच, उपसरपंच यांंचा सत्कार करण्यात आला, तर सर्व महिला सदस्यांनी एकमेकींना पेढा भरविला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला. सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत व बिनविरोध पार पडल्याने काळचौंडी ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.

२४काळचौंडी

फोटो : काळचौंडी ग्रामपंचायतीच्या निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिला सदस्यांनी आनंदोत्सव साजरा केला.