शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
3
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
4
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
5
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
6
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
7
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
8
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
9
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
10
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
11
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
12
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
13
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
14
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
15
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
16
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
17
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
18
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
19
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
20
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
Daily Top 2Weekly Top 5

Hind Kesari Wrestling Competition: पृथ्वीराज मोहोळ जखमी झाल्याने महेंद्र गायकवाड ठरला हिंदकेसरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 15:41 IST

हरियाणाची काजल चोचाल ठरली महिला हिंदकेसरी

सातारा : खचाखच भरलेले साताऱ्याचे जिल्हा क्रीडा संकुल... त्यातून घुमणारे मल्लांच्या शड्डूचा आवाज अन् उचल मर्दा टाक डाव... असे प्रेक्षकांमधून येणारे आवाज... याच भारावलेल्या वातावरणात महेंद्र गायकवाड याने हिंद केसरीची गदा पटकावली. सुरुवातीलाच महेंद्र याने दोन गुण मिळवले. दरम्यान यावेळी पृथ्वीराज मोहोळ हा जखमी झाल्यामुळे पंचानी महेंद्र गायकवाड याला विजयी घोषित केले. यावेळी महिलांच्याही हिंद केसरी स्पर्धा पार पडल्या. यात हरियाणाची पैलवान काजल चोचाल हिने मानाची गदा पटकावली.

शेकडो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर रविवारी रात्री ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. यंदा महाराष्ट्रामधील दाेन मल्ल हिंदकेसरीच्या गदेसाठी झुंजत असल्याने मैदानावर प्रेक्षकांचा प्रचंड जल्लाेष अनुभवयास मिळाला.

कुस्ती महर्षी साहेबराव पवार यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत, महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या मान्यतेने राजेश्वर प्रतिष्ठान सातारा व तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली. शेवटच्या दिवशी सहभागी मल्लांचे उपांत्य व अंतिम सामना घेण्यात आले. उपांत्य सामन्यामध्ये महाराष्ट्रातीलच महेंद्र गायकवाड व पृथ्वीराज माेहाेळ यांच्यात लढत झाली.

यामध्ये उपांत्य सामन्यामध्ये पहिली कुस्ती दिल्ली येथील अनिरूध्द पैलवान व उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये रंगली. महेंद्र गायकवाड याने चांगली सुरूवात करत दाेन गुण मिळवले तर अनिरूध्द याने देखील दुहेरी पट काढत दाेन गुणांची कामाई केली. दाेन-दाेन अशी बराेबरी झाल्याने हिंदकेसरीचे मैदान काेण काढणार याची कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याने मैदानावर शांतता पसरली.

दुसऱ्या फेरीला सुरूवात हाेताच महेंद्र व अनिरूध्द यांनी प्रत्यकी दाेन गुण मिळवल्याने सामना चार-चार असा बराेबरीत सुटला. त्यानंतर महेद्र यांनी चपळाईने चार गुणाची कमाई केली. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड याने नऊ गुणांची कमाई करत अनिरूध्द पैलवान याचा पराभव केल्याने त्याने फायनलचे तिकीट कन्फर्म केले.

उपांत्य फेरीमधील दुसरी कुस्ती महाराष्ट्राचा पृथ्वीराज माेहाेळ व रझद मंडाेती यांच्यामध्ये झाली. सामन्याच्या सुरुवातीला पृथ्वीराज याने चार गुणांची कमाई करत आघाडी मिळवली. रजतने दुहेरी पट टाकला, मात्र पृथ्वीराजने चपळाईने बचाव केला. या सामन्यात पृथ्वीराजने रजतवर मात करीत अंतिम सामना काढला.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahendra Gaikwad Crowned Hind Kesari as Prithviraj Mohol Gets Injured

Web Summary : Mahendra Gaikwad won the Hind Kesari title after Prithviraj Mohol was injured. Gaikwad initially scored two points. Haryana's Kajal Chochal won the women's title. The final, held in Satara, saw intense competition and enthusiastic crowds.